Upcoming Films & Shows on OTT: कोड एम ते ब्रोकन न्यूज; पाहा या आठवड्यात कोणकोणत्या सीरिज होणार रिलीज
पाहा कोणत्या सीरिज या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार आहेत...
Web Series Releasing This Week On OTT : जून महिन्याचा दुसरा आठवडा हा वेब सीरिजच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे. या आठवड्यात आनेक वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. 'कोड एम' ते 'मिस मार्वल' पाहा कोणत्या सीरिज या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार आहेत...
1. आशिकाना (Aashiqana)
6 जून रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर ‘आशिकाना’हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोमध्ये इबाद खान आणि खुशी दुबे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा रोमँटिक थ्रिलर शो आहे. याचे दिग्दर्शन गुल खान यांनी केलं आहे. या कार्यक्रमाचा दररोज एक नवा एपिसोड असणार आहे.
2. मिस मार्वल (Miss Marvel)
आठ जून रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर मार्व्हल ही सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजचे सहा एपिसोड हे हिंदी, तमिल, तेलगु, मल्याळम आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. 'मिस मार्वल' ही सीरिज सना अमानत, स्टीफन वेकर, जी. विलो विल्सन, एड्रियन अल्फोना आणि जेमी मॅककेल्वी यांच्या मार्वल कॉमिक्स कॅरेक्टरवर आधारित असणार आहे.
3. कोड एम (Code M)
9 जून रोजी व्हूटवर 'कोड एम’ही सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री जेनिफर विंगेट ही प्रमुख भूमिका साकारणार आहे.
4. ब्रोकन न्यूज (Broken News)
10 जून रोजी झी 5 वर ‘ब्रोकन न्यूज’ही सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजमधून अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही ओटीटीवर डेब्यू करणार आहे. यामध्ये 'पाताल लोक' फेम अभिनेते जयदीप अहलावत आणि अभिनेत्री श्रिया पिळगावकर, राधा भार्गव हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा: