एक्स्प्लोर
हृतिकची घटस्फोटित पत्नी सुझान खानवर फसवणुकीचा गुन्हा
पणजी : बॉलिवूडस्टार हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी, सुप्रसिद्ध डिझायनर सुझान खानविरोधात पणजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1.87 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुझान खान अडचणीत आली आहे.
एमजी प्रॉपर्टीज या रिअल इस्टेट फर्मच्या तक्रारीनुसार सुझानने आर्किटेक्ट असल्याचं भासवून कंपनीसोबत करार केल्याचं म्हटलं आहे. एमजी प्रॉपर्टीजचे मॅनेजिंग पार्टनर मुधित गुप्ता यांनी तक्रार दाखल केली आहे. सप्टेंबर 2013 मध्ये कंपनीने तिच्याशी आर्किटेक्चरल आणि डिझायनिंग सेवांसाठी लिखित करार केल्याची माहिती आहे.
उत्तर गोवातील तिसवाडीमधल्या सिरिदाओत बांधल्या जाणाऱ्या नायरा कॉम्प्लेक्ससाठी हा करार झाला होता. करारात नमूद केलेल्या कालावधीत काम पूर्ण करण्यास सुझान अपयशी ठरल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
पोलिस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करत होते, त्यामुळे आपण कोर्टात धाव घेतली. मात्र त्याचवेळी पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला, असंही गुप्तांनी सांगितलं. सुझान खानकडून अद्याप याविषयी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement