Supriya Pathare: हॉटेलचा स्टाफ अचानक निघून गेला, दागिनेही विकावे लागले; सुप्रिया पाठारे म्हणाली, "शत्रूवरही अशी वेळ येऊ नये"
Supriya Pathare: महाराज फास्ट फूड कॉर्नर हे सुप्रिया पाठारेचं हॉटेल काही दिवसांसाठी बंद करण्यात आलं होतं. अशताच हॉटेल बंद असताना कोणकोणत्या संकटांना समोरं जावं लागलं? याबद्दल सुप्रियानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
Supriya Pathare: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) आणि तिचा मुलगा मिहीर पाठारे यांनी काही महिन्यांपूर्वी महाराज फास्ट फूड कॉर्नर या नावाच्या रेस्टॉरंट सुरु केलं. त्यांच्या या रेस्टॉरंटला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण काही कारणांमुळे हे हॉटेल काही दिवसांसाठी बंद करण्यात आलं होतं. अशताच हॉटेल बंद असताना कोणकोणत्या संकटांना समोरं जावं लागलं? याबद्दल सुप्रियानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
सुप्रिया म्हणाली,"हॉटेलचा स्टाफ अचानक निघून गेला"
सुप्रियानं लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं, "आता महाराजा हॉटेलला सुरुवात झाली आहे. पण दोन महिने हॉटेल बंद होतं. त्याचा बराच परिणाम झाला. कॅन्सरमुळे माझी आई गेली तसेच बरेच एकामोगून प्रसंग एक येत गेले. पहिल्यांदा हॉटेल जेव्हा बंद झालं तेव्हा स्टाफचं निघून गेला. मी नवीन हॉटेल सुरु करणाऱ्यांना हे सांगू इच्छिते की, एकाच गावातले किंवा एकाच घरातले लोक स्टाफ म्हणून तुमच्या हॉटेलमध्ये घेऊ नका, कारण जसे ते एकत्र येतात तसेच ते एकत्र जातात. एकदा आम्ही हॉटेल बंद करुन आलो तेव्हा मिहीर मला म्हणाला की, मी स्टाफ रुममध्ये जाऊन उद्याच्या तयारीचं बघतो. पण नंतर कळालं की, स्टाफमधील पाचही जणं निघून गेले होते. आम्ही त्या स्टाफला फोन लावत होतो. पण त्यांना फोन देखील लागत नव्हता."
पुढे सुप्रिया पाठारे म्हणाली, "नंतर पुन्हा हॉटेल सुरु केलं. तीन दिवस हॉटेल छान सुरु होतं. पण नंतर मिहीरच्या हाताला दुखापत झाली. मिहीरचा हात पूर्ण भाजला. तो एका हातानं जेवण नाही बनवू शकत. मग पुन्हा हॉटेल बंद केलं. हॉटेल बंद होतं, तो दोन महिन्याचा काळ खूप वाईट होता. अशी वेळ शत्रूवरही येऊ नये. "
"हॉटेल बंद असताना दोन महिने भाडे थकले होते. त्या दोन महिन्यांमध्ये मी दागिनेही विकले. कोणाकडून तरी पैसे घ्यायचे आणि सर्व्हाइव्ह करायचं, हे मला पटत नव्हतं." असंही सुप्रियानं सांगितलं.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: