(Source: ECI/ABP News/ABP Majha)
South Indian Movies : साऊथच्या या '8' चित्रपटांच्या क्लायमॅक्स पाहिल्यास डोकं सुन्न होऊन जाईल!
South Indian Movies : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या, वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. साऊथच्या आठ सिनेमांचा क्लायमॅक्स पाहून डोकं सुन्न होऊन जाईल.
South Indian Movies : साऊथमध्ये अॅक्शनचा तडका असणाऱ्या सिनेमांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असली तरी विविध विषयांवर भाष्य होणाऱ्या आणि वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांची (South Indian Movies) निर्मिती होत आहे. यातील काही सिनेमांतील क्लायमॅक्सने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात 'कांतारा'(Kantara),'बाहुबली'(Baahubali),'दृष्यम' (Drishyam), 'पिज्जा' (Pizza),'जेलर', (Jailer), ए वतन मेरे वतन (Ae Watan Mere Watan), रत्सासन (Ratsasan), फॉरेंसिक (Forensic), यू-टर्न (U-Turn) या आठ सिनेमांचा समावेश आहे.
1.) कांतारा (Kantara) : ऋषभ शेट्टीच्या (Rishab Shetty)'कांतारा' या सिनेमाने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. या सिनेमातील क्लायमॅक्सने डोकं सुन्न होऊन गेलं. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने दणदणीत कमाई केली.
2.) बाहुबली (Baahubali) : 'बाहुबली' या सिनेमाने क्लायमॅक्सने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. 'कटप्पा'ने बाहुबलीला का मारलं? या गोष्टीची क्रेझ सिनेमाच्या रिलीजनंतर दोन वर्षे कायम होती. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली.
3.) दृष्यम (Drishyam) : मोहनलालच्या 'दृष्यम'ने मल्याळम इंडस्ट्रीसह देशभरातील सिनेप्रेमींचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं. आजही हा सिनेमा आवडीने पाहिला जातो.
4.) पिज्जा (Pizza) : विजय सेतुपतीचा 'पिज्जा' हा सिनेमा 2012 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या हॉरर थ्रिलर सिनेमातील क्लायमॅक्स खूपच लक्षवेधक होता.
5.) जेलर (Jailer) : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या जेलर या सिनेमातही खूप कमाल क्लायमॅक्स होता. रजनीकांतसह या सिनेमात विनायकन, रम्या कृष्णन, वसंत रवी, मिर्ना मेनन आणि योगी बाबू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.
6.) ए वतन मेरे वतन (Ae Watan Mere Watan) : सारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन (Ae Watan Mere Watan) या सिनेमानेदेखील प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. उषा मेहता यांचा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला होता.
7.) रत्सासन (Ratsasan) : रत्सासन सिनेमातील क्लायमॅक्सदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
8.) यू-टर्न (U-Turn) : यू-टर्न (U-Turn) सिनेमातील क्लायमॅक्सने प्रेक्षकांना हैराण केलं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल.
गुंटूर करम, देवरा, पुष्पा 2 असे अनेक दाक्षिणात्य सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सर्व सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. थरार, नाट्य, रहस्य, अॅक्शन अशा सर्व गोष्टी प्रेक्षकांना एकाच सिनेमात पाहायला मिळणार आहेत.
संबंधित बातम्या