Prime Video Release 70 Web Series Movies : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून 70 वेबसीरिज, चित्रपटांची घोषणा, मिर्झापूर, पंचायत, फॅमिली मॅनचा तिसरा सीझन कधी? पाहा यादी
Prime Video India to Release 70 Series And Movies : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने मोठा धमाका करत एकाच वेळी 70 वेब सीरिज, चित्रपटांची घोषणा केली आहे.
Prime Video India to Release 70 Series And Movies : ओटीटी प्लॅटफॉर्मवरही जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने आपल्या नव्या चित्रपटांची, वेब सीरिजची घोषणा केल्यानंतर आता अॅमेझॉन प्राईमने दहा-पंधरा नव्हे तर तब्बल 70 वेब सीरिज आणि चित्रपटांची घोषणा केली. मंगळवारी एका कार्यक्रमात अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने घोषणा केली. अॅमेझॉन प्राईमच्या या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये नव्या वेब सीरिजबद्दल उत्सुकता वाढली आहे. मिर्झापूर, पंचायत, फॅमिली मॅन या मोस्ट अवेटेड वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचीदेखील घोषणा करण्यात आली. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' ही वेब सीरिजची घोषणा करण्यात आली. नागराज मंजुळे या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. तर, पाताल लोक या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
70 वेब सीरिज-चित्रपटांची घोषणा
19 मार्च रोजी मुंबईत प्राइम व्हिडिओचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुमारे 70 मालिका आणि चित्रपटांची घोषणा करण्यात आली. या यादीत चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचाही समावेश आहे. फॅमिली मॅन, मिर्झापूर आणि पंचायत या वेब सीरिजचा तिसरा सीझन याच वर्षी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.
View this post on Instagram
अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर घोषणा झालेल्या वेब सीरिज-चित्रपट
सिटाडेल: हनी बनी (हिंदी)
गुलकंद टेल्स (हिंदी)
मटका किंग (हिंदी)
दुपहिया (हिंदी)
इंस्पेक्टर ऋषी (हिंदी)
स्नेक्स अॅण्ड लॅडर (तमिळ)
द राणा कनेक्शन (तेलगु)
गँग्स कुरुथी पुनाल (तमिळ)
रंगीन (हिंदी)
द ग्रेट इंडियन कोड (हिंदी)
खौफ (हिंदी)
अरबिया कदाली (तेलगु)
द रेवोल्युशनरिज (हिंदी)
दलदल (हिंदी)
अंधेरा (हिंदी)
इन ट्रांजिट (हिंदी)
डेयरिंग पार्टनर्स (हिंदी)
कॉल मी बे (हिंदी)
द ट्राइब (हिंदी)
फॉलो करलो यार (हिंदी)
दिल दोस्ती डिलेमा (हिंदी)
बँडवाले (हिंदी)
जिद्दी गर्ल्स (हिंदी)
वाक गर्ल्स (हिंदी)
मां कसुम (हिंदी)
ऐ वतन मेरे वतन (हिंदी)
सुपरमॅन ऑफ मालेगांव (हिंदी)
चीकाती लो (तेलगु)
उप्पू कप्पू रंबू (तेलगु)
बी हॅप्पी (हिंदी)
द मेहता बॉईज (हिंदी)
छोरी 2 (हिंदी)
सूबेदार (हिंदी)
कंतारा - ए लिजेंड चॅप्टर 1 (कन्नड)
चंदू चॅम्पियन (हिंदी)
सनकी (हिंदी)
हाउसफुल 5 (हिंदी)
बागी 4 (हिंदी)
शूजीत सरकारचा आगामी प्रोजेक्ट (हिंदी)
हरि हर वीरा मल्लू (तेलगु)
कंगुवा (तमिळ)
वा वाथियार (तमिळ)
स्त्री 2 (हिंदी)
इक्कीस (हिंदी)
तेरी बातों में ऐसा उलझा जिया (हिंदी)
अश्वत्थामा - द सागा कॉन्टिन्यूज (हिंदी)
उस्ताद भगत सिंह (तेलगु)
थम्मुडु (तेलगु)
गेम चेंजर (तेलगु)
फॅमिली स्टार (तेलगु)
सिंघम अगेन (हिंदी)
ओम भीम बुश (तेलगु)
घाटी (तेलगु)
वीमेन ऑफ माय बिलियन (हिंदी)
योद्धा (हिंदी)
बॅडन्यूज (हिंदी)
युधरा (हिंदी)
ग्राउंड ज़ीरो (हिंदी)
अग्नि (हिंदी)
मडगांव एक्सप्रेस (हिंदी)
डॉन 3 (हिंदी)
पाताल लोक सीझन 2 (हिंदी)
बंदिश बँडिट्स सीझन 2 (हिंदी)
सुझल - द वोर्टेक्स सीझन 2 (तमिळ)
पंचायत सीझन 3 (हिंदी)
थलाइवट्टियां पलायम (पंचायत तमिळ)
शिवरापल्ली (पंचायत तेलगु)
मिर्झापूर सीझन 3 (हिंदी)