Sara Tendulkar : सारा तेंडुलकर साडीमध्ये अवतरल्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला! शुभमनचाही विषय निघाला
Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) लाडकी लेक साराची लेटेस्ट पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तिच्या भारतीय लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे.
![Sara Tendulkar : सारा तेंडुलकर साडीमध्ये अवतरल्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला! शुभमनचाही विषय निघाला Sara Tendulkar New Instagram post with Indian look video viral on Social Media fans Reacted Fans Call Shubman Gill Sachin Tendulkar Daughter Latest Update Know Bollywood Entertainment Latest Update Sara Tendulkar : सारा तेंडुलकर साडीमध्ये अवतरल्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला! शुभमनचाही विषय निघाला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/19/7f40815345c8855bb169641998bb6c401708351147057254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sara Tendulkar Indian Look Video : क्रिकेटर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) लाडकी लेक साराने (Sara Tendular) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सारा तेंडुलकरचा (Sara Tendulkar) एक मोठा चाहतावर्ग आहे. सारा आणि क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill) एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. आता अभिनेत्रीच्या लेटेस्ट फोटोने चाहत्यांना वेड लावलं आहे. तिचा फोटो पाहून नेटकऱ्यांना शुभमनची आठवण आली आहे.
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता साराची एक लेटेस्ट पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तिच्या भारतीय लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. साराने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. त्यावरील तिची ज्वेलरीदेखील खूपच खास आहे.
साराच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव
साराच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आता शुभमन भाऊ षटकार मारणार, डबल सेंच्युरी कंफर्म, सोणी कुडी, किती सुंदर, शुभमन भावा लक्ष दे, वहिणी, किती सुंदर दिसणार, ब्युटी, क्रश, सारा आता नॅशनल क्रश, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनीदेखील तिच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. रवीना टंडनची लेक राशा थडानीने लिहिलं आहे,"सुंदर". झारा खानने लिहिलं आहे,"गॉर्जियस". सारच्या पोस्टला 16 तासांत 7 लाख, 46 हजार लाईक्स मिळाले आहेत.
View this post on Instagram
सारा तेंडुलकरचं नाव अनेक दिवसांपासून क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडलं जात आहे. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. पण अद्याप दोघांनी त्यांचं नातं जगजाहीर केलेलं नाही. सारा आणि शुभमन यांचं लवकरात लवकर लग्न व्हावं, अशी चाहत्यांची इच्छा आहे.
सारा तेंडुलकरबद्दल जाणून घ्या.. (Sara Tendulkar Details)
सारा तेंडुलकरने लंडन विद्यापीठातून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलं आहे. शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. सारा तेंडुलकरचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 54 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. काही वर्षांपूर्वी सारा शाहिद कपूरसोबत डेब्यू करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यानंतर सचिन तेंडुलकरने हे वृत्त फेटाळून लावत आपली मुलगी सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले. आता सारा भविष्यात काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या
Sachin Tendulkar on Shubman Gill : शुभमन गिलचा शतकी नजारा; कौतुक करताना सचिन तेंडुलकरच्या दोनच वाक्यांनी सर्वांचे लक्ष वेधले!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)