(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Society : गौरव मोरेच्या 'सलमान सोसायटी' सिनेमातील 'अभ्यासू कीडा' गाणं आऊट; उपेंद्र लिमयेंची खास भूमिका
Salman Society : 'सलमान सोसायटी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Salman Society : 'सलमान सोसायटी' (Salman Society) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौरव मोरेच्या (Gaurav More) या सिनेमातील 'अभ्यासू कीडा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सिनेमात अभिनेते उपेंद्र लिमये (Upendra Limaye) यांची खास भूमिका असणार आहे.
'सलमान सोसायटी' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील दुसरं गाणं आज लॉन्च करण्यात आले असून 'अभ्यासू कीडा' असे या गाण्याचे बोल आहेत. उपेंद्र लिमये, विनायक पोतदार आणि नितीन एम यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले.
'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'सलमान सोसायटी' (Salman Society Release Date)
'सलमान सोसायटी' (Salman Society) सिनेमाचे दिग्दर्शन कैलाश पवार यांनी केली आहे. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. 'अभ्यासू कीडा' हे गाणे श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केले आहे आणि गायक सुहास सावंत ने गायले आहे. 17 नोव्हेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शक कैलाश पवार म्हणाले,"हे गाणे खूपच मनोरंजक असून प्रत्येक शाळेत वाजेल अशी अपेक्षा आहे , उपेंद्र सरांनी खूपच सुंदर परफॉर्म केले आहे. त्यामुळे हे गाणे आणखीनच सुंदर होते. खुप बच्चे कंपनी हे गाणं एन्जॉय तर करतील पण पालक ही पसंत करतील या खात्री आहे".
उपेंद्र लिमये दिसणार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत
'सलमान सोसायटी' या सिनेमात आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. सिनेमात उपेंद्र लिमये (Upendra limaye) पाहुण्या भूमिकेत आहे. तसेच सिनेमामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
'सलमान सोसायटी' या सिनेमात आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारा गौरव मोरे (Gaurav More) एका वेगळ्या पण महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत.
संबंधित बातम्या