एक्स्प्लोर
29 वर्षांची रिचा 42 वर्षांच्या हृतिकच्या आईच्या भूमिकेत?
मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेकदा कलाकार आपली इमेज बदलण्यासाठी खऱ्या वयापेक्षा खूप जास्त वयाची भूमिका साकारण्याचं आव्हान पेलतात. अगदी ऋषी कपूर यांनी कपूर अँड सन्समध्ये साकारलेली आजोबांची व्यक्तिरेखा असो, किंवा अमिताभ बच्चनने साकारलेली 'पा'मधील वयापेक्षा कितीतरी पटींनी लहान भूमिका.
मसान मधील अभिनयाने छाप पाडलेली बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाला हृतिक रोशनच्या आईची भूमिका साकारण्यासाठी विचारणा झाली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अग्निपथ चित्रपटात हृतिकच्या आईच्या भूमिकेसाठी तिला ऑफर होती.
गँग्ज ऑफ वासेपूरमध्ये तिने नवाझुद्दीन सिद्दीकीच्या आईची भूमिका केल्यामुळे तिला ही ऑफर झाल्याचं खुद्द रिचाने एका मुलाखतीत सांगितलं. रिचा चढ्ढा सध्या फक्त 29 वर्षांची असून हृतिक 42 वर्षांचा आहे.
रिचाने मसान, तमंचे, मै और चार्ल्स सारख्या सिनेमात भूमिका केल्या असून कॅब्रे, सरबजित हे तिचे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement