Ravi Jadhav: 'आमच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी ...'; खास पोस्ट शेअर करुन रवी जाधव यांनी केलं हेमांगी कवीचं कौतुक
रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी वेब सीरिजमधील हेमांगी कवीच्या (Hemangi Kavi) अभिनयाचं कौतुक केलं आहे.
Ravi Jadhav: 'ताली' (Taali) ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झाली. या वेब सीरिजचं दिग्दर्शन रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी केले आहे. तसेच अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. नुकतेच रवी जाधव यांनी ताली या वेब सीरिजबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून रवी जाधव यांनी वेब सीरिजमधील हेमांगी कवीच्या (Hemangi Kavi) अभिनयाचं कौतुक केलं आहे.
रवी जाधव यांची पोस्ट
रवी जाधव यांनी हेमांगीचा एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हेमांगी कवी आमच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी. तिने अभिनय केलेल्या ‘धुडगूस’ या सुंदर चित्रपटाची जाहिरात मी केली होती परंतु एकत्र काम पहिल्यांदाच ‘ताली’ मध्ये केले. छोटेशी व्यक्तीरेखा असुनही तीने ती ज्या ताकदीने साकारली आहे की जी प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील!!' रवी जाधव यांच्या या पोस्टला हेमांगीनं कमेंट केली, 'थँक्यु सो मच सिनियर'
हेमांगीनं ताली या वेब सीरिजमध्ये स्वाती ही भूमिका साकारली आहे. जी गौरीची बहिण असते. 'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हेमांगीनं अनेक नाटक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
View this post on Instagram
गौरी सावंत यांचा संघर्ष या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. या सीरिजमधील सुष्मिताच्या अभिनयाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. क्षितीज पटवर्धन यांनी वेब सीरिजचं लेखन केले आहे.
नितेश राठोड, अंकुर भाटिया, कृतिका देव, ऐश्वर्या नारकर, सुव्रत जोशी, विक्रम भाम,नंदू माधव आणि अनंत महादेवन या कलाकारांनी ताली या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. ताली ही वेब सीरिज JioCinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आली. या वेब सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. सखी गोखले,हेमंत ढोमे,सुबोध भावे या कलाकारांनी देखील या वेब सीरिजचं कौतुक केलं.
वाचा इतर सविस्तर बातम्या: