Taali: सासूबाई आणि पत्नीकडून सुव्रतचं कौतुक; 'ताली' वेब सीरिज पाहिल्यानंतर सखी आणि शुभांगी गोखलेंनी शेअर केली पोस्ट
सखी गोखले (Sakhi Gokhale) आणि शुभांगी गोखले ( Shubhangi Gokhale) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन ताली वेब सीरिजमधील सुव्रतच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
Taali: 'ताली' (Taali) ही वेब सीरिज 15 ऑगस्टला या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. या सीरिजचं अनेकजण कौतुक करत आहेत. प्रसिद्ध अभिनेता सुव्रत जोशीनं (Suvrat Joshi) ताली या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. सुव्रतची पत्नी सखी गोखले (Sakhi Gokhale) आणि त्याच्या सासूबाई म्हणजेच अभिनेत्री शुभांगी गोखले ( Shubhangi Gokhale) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन ताली वेब सीरिजमधील सुव्रतच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
शुभांगी गोखले यांची पोस्ट
'ताली , श्री गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित ताली ही वेबसिरीज जियो सिनेमावर दाखल झालीये..कमाल..पेपर,बातम्या,टीव्ही,मुलाखतींमधून श्री गौरी यांना जाणून होतेच.. क्षितीज पटवर्धन,किती नीटसपणे, नेमकं आणि परिणामकारक लेखन केलेस.. हेमांगी,ऐश्वर्या,नंदूमाधव,शीतल कृत्तिकाआणि सुव्रत.. फार फार आवडली तुमची कामं. दिग्दर्शक रवि जाधव.. one more feather in his cap आणि सुष्मिताजी चपखल हा शब्द जिवंत केलायत तुम्ही ..Doing a role च्या पलीकडे being a role काय ताकदीने दाखवलंयत तुम्ही..एव्हाना मराठी चांगलंच शिकला असाल-त्यामुळे एवढंच म्हणेन, चाबूक झालंय काम! श्रीगौरी सावंत यांच्या आयुष्यासारखंच..'
View this post on Instagram
शुभांगी गोखले यांनी शेअर केलेल्या पोस्टला सुव्रतनं कमेंट केली, 'तुझ्याकडून कौतुकाची थाप मिळाली, बास आणखी काय हवं? तुला आवडली याचा विशेष आनंद आहे.'
सुव्रतची पत्नी सखी गोखलेनं देखील खास पोस्ट शेअर करुन ताली वेब सीरिजचं कौतुक केलं आहे.
सुबोध भावे, हेमंत ढोमे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या वेब सीरिजचं कौतुक केलं. दिग्दर्शक रवी जाधव ताली या वेब सीरिजचं दिग्दर्शिन केलं आहे. तसेत क्षितीज पटवर्धन हे या वेब सीरिजचं लेखन आहेत. या वेब सीरिजमध्ये सुव्रतसोबत हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, नंदू माधव या मराठी कलाकारांनी देखील काम केलं आहे. तसेच या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेननं (Sushmita Sen) केलेल्या अभिनयाचं देखील अनेकजण सध्या कौतुक करत आहेत. ही वेब सीरिज JioCinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता.
वाचा इतर सविस्तर बातम्या:
Taali : हेमंत ढोमे ते सुबोध भावे; 'या' मराठी कलाकारांनी केलं सुष्मिताच्या 'ताली' वेब सीरिजचं कौतुक