
Ranbir Kapoor : कतरिनावर अजूनही रणबीरची नजर? एका मुलाखती दरम्यान रणबीरने केला खुलासा
Ranbir Kapoor : रणबीर कपूर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसला तरी तो सध्या चर्चेत आहे.
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसला तरी सोशल मीडियावर मात्र तो चर्चेत असतो. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चाहते प्रतीक्षा करत असले तरी रणबीर आता कतरिना कैफमुळे चर्चेत आला आहे. कतरिना आणि रणबीरचं प्रेम जगजाहीर होतं. पण आता कतरिना कैफ नुकतीच विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकली आहे.
रणबीर कपूर एका मुलाखती दरम्यान म्हणाला, "मी अजूनही कटरिनाला फॉलो करतो". रणबीर आणि आलिया लग्नबंधनात अडकणार असल्याने तसेच कतरिना आणि विकी नुकतेच लग्नबंधनात अडकल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. रणबीर कपूर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसला तरी कोणत्या कलाकाराचं काय चाललंय हे त्याला माहित असतं.
View this post on Instagram
मुलाखती दरम्यान रणबीर म्हणाला,"दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि आलिया भट्टला मी फॉलो करतो. या यादीत एक्स गर्लफ्रेंड कतरिनाचंही नाव घ्यायला रणबीर विसरला नाही. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसण्याबद्दल रणबीर म्हणाला,"सोशल मीडियात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. आणि याच गोष्टी आपलं आयुष्य बदलू शकतात. त्यामुळे मी सोशल मीडियात अॅक्टिव्ह नसतो. यापासून दूर राहणंच चांगलं".
संबंधित बातम्या
Sonu Sood : अभिनेता सोनू सूदचा मदतीचा हात, 11 वर्षीय जान्हवीची अपंगत्वावर मात
Irrfan Khan Birth Anniversary : आयुष्याच्या रंगमंचावरुन अचानक एक्झिट घेणाऱ्या इरफान खानच्या 'या' आहेत गाजलेल्या भूमिका
Films Get Postponed Due To Corona : बॉलिवूडच्या पाच बिग बजेट सिनेमांना कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलल्या पुढे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
