Irrfan Khan Birth Anniversary : आयुष्याच्या रंगमंचावरुन अचानक एक्झिट घेणाऱ्या इरफान खानच्या 'या' आहेत गाजलेल्या भूमिका
Irrfan Khan Birth Anniversary : आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला पूर्णपणे न्याय देणारे आणि ती भूमिका अक्षरश: जगणारे अभिनेते इरफान खान यांनी 2020 या वर्षी जगाचा निरोप घेतला.
Irrfan Khan Birth Anniversary : अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांचे सर्वच सिनेमे प्रेक्षकांना आवडतात. आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला पूर्णपणे न्याय देणारे आणि ती भूमिका अक्षरश: जगणारे अभिनेते म्हणजे इरफान खान होय. इरफान खान यांनी केवळ हिंदी सिनेंमातच नाही तर अमेरिकन आणि ब्रिटिश चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. जाणून घ्या इरफान खान यांनी साकारलेल्या 5 प्रेरणादायी भूमिका.
मकबूल (Maqbool)
मकबूल सिनेमा 2004 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात इरफान खान मुख्य भूमिकेत होते. सिनेमात इरफान खानसह तब्बू आणि पंकज कपूरदेखील मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसली तरी इरफानच्या चाहत्यांना मात्र इरफानची भूमिका आवडली होती. सिनेमात इरफान यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.
लाईफ ऑफ पाय (Life of Pi)
लाईफ ऑफ पाय सिनेमात इरफान खान यांनी प्रौढ पिसिन पटेलची भूमिका साकारली होती.
आव्हानात्मक भूमिका सहजपणे साकारल्याने प्रेक्षकांना सिनेमा चांगलाच भावला. इरफानचा हा सिनेमा 2012 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने इरफान खान यांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली.
द लंचबॉक्स (The Lunchbox)
'द लंचबॉक्स' सिनेमा 2013 साली प्रदर्शित झाला होता. सिनेमात इरफान खान यांनी साकारलेल्या भूमिकेचे कौतुक झाले होते. सिनेमात त्यांच्या वाट्याला आलेलं पात्र, संवादकौशल्य, रुपेरी पडद्यावरील त्यांचा वावर, अद्वितीय अभिनय कौशल्य, भूमिकेची निवड तसेच काळजाला भिडणारी नजर आणि तितकाच प्रभावी आवाज या घटकांवर इरफान यांची विशेष पकड असल्याने सिनेमाला उत्तम यश मिळाले.
तलवार (Talvar)
तलवार सिनेमा 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले होते. इरफान खान यांनी सिनेमात तपास अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा रहस्यमय सिनेमा आहे. सिनेमात इरफान यांनी जबाबदारीने भूमिका हाताळली आहे.
View this post on Instagram
कर्करोगाशी प्रदीर्घ काळासाठी झुंज दिल्यानंतर अभिनेता इरफान खान यांनी या जगाचा निरोप घेतला. वयाच्या 53 व्या वर्षीच आयुष्याच्या या रंगमंचावरुन एक्झिट घेणाऱ्या या अष्टपैलू अभिनेत्यानं होऊ घातलेल्या नवोदित कलाकारांसाठी कलेचा कधीही न संपणारा साधा आणि वारसा मागे ठेवला आहे. त्यामुळं इरफान आज आपल्यात नसले तरीही त्यांचं अस्तित्वं मात्र विविध रुपांनी आपल्यात आहे ही बाब नाकारता येत नाही.
संबंधित बातम्या
Films Get Postponed Due To Corona : बॉलिवूडच्या पाच बिग बजेट सिनेमांना कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलल्या पुढे
Sara Ali Khan : सारा अली खान करतेय 'या' व्यक्तीला डेट? ज्याची आहे कोट्यवधीची संपत्ती
Jhimma Movie : 'झिम्मा'चे रेकॉर्डब्रेक अर्धशतक! पन्नास दिवसात बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha