Pushpa 2 Collection : 'स्त्री 2' समोर 'पुष्पा 2' पुन्हा फेल, बॉक्स ऑफिसवर 'सरकटे का आतंक'; कमाईच्या बाबतीत अल्लू अर्जूनच्या चित्रपट अजूनही मागेच
Pushpa 2 Box Office Collection : पुष्पा 2 चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाई सुरु आहे. चित्रपटाचं 46 व्या दिवसाचं कलेक्शन जाणून घ्या.
Pushpa 2 Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या पुष्पा 2 चित्रपटाची क्रेझ काही कमी झालेली दिसत नाही. सुकुमार दिग्दर्शित अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्याप कायम आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा 2' हा चित्रपट चित्रपट प्रदर्शित होऊन दीड महिना उलटूनही बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवून आहे. पुष्पा 2 रिलीजच्या 46 व्या दिवशी रविवारी वीकेंडचा फायदा झाल्याचं दिसून आलं. या वीकेंडला पुष्पा 2 चित्रपटाच्या कमाईने जोर पकडला.
रिलीजच्या 46 व्या दिवशी, पुन्हा एकदा पुष्पा द रुलच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे आणि आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने उत्तम व्यवसाय केला आहे. पुष्पा 2 चित्रपट 5 डिसेंबर 2024 ला प्रदर्शित झाला होता, त्यानंतर 19 जानेवारीला रिलीजच्या 46 व्या दिवशी, 'पुष्पराज' कलेक्शनच्या बाबतीत पुन्हा एकदा त्याच्या जुन्या स्वरूपात आल्याचं दिसत आहे. पुष्पा 2 ने आठवड्याच्या शेवटी ब्लॉकबस्टर कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. असं असलं तरी कमाईच्या बाबतीत अजूनही हा चित्रपट
स्त्री 2 च्या मागे आहे.
पुष्पा 2 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 725.8 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात 129.5 कोटी रुपये कमावले. चित्रपटाचे कलेक्शन चौथ्या आठवड्यात 69.65 कोटी आणि पाचव्या आठवड्यात 25.25 कोटी रुपये होते.
'पुष्पा 2' चित्रपटाने सहाव्या आठवड्यात 9.7 कोटींचा गल्ला जमवला. यानंतर, सातव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रिलीजनंतर 44 व्या दिवशी 95 लाख रुपये आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 45 व्या दिवशी 1.1 कोटी रुपये कमावले. सकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने 46 व्या दिवशी सकाळी 10:50 वाजेपर्यंत चित्रपटाची कमाई 1.18 कोटींची कमाई केली. यानंतर चित्रपटाचं एकूण कलेक्शन 1227.93 कोटी रुपये झालं आहे. तथापि, हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
46 व्या दिवशी पुष्पा 2 ची कमाई किती?
पुष्पा 2 चित्रपटाने 46 व्या दिवशीही कमाईत अभिनेता शाहरुख खानच्या जवान आणि पठाण तसेच गदर 2 आणि अॅनिमल सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे. 46 व्या दिवशी जवानने 35 लाख, पठाणने 61 लाख आणि गदर 2 ने 35 लाख कमावले.
पुष्पा 2 चित्रपट स्त्री 2 चित्रपटाच्या मागे
अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाने जवान, गदर 2, पठाण चित्रपटांना मागे टाकलं आहे, पण तरीही तो श्रद्धा कपूरच्या स्त्री 2 च्या पातळीवर पोहोचलेला नाही. स्त्री 2 चित्रपटाने 46 व्या दिवशी 2.5 कोटींची कमाई केली होती, जी पुष्पा 2 चित्रपटाला करता आलेली नाही. याबाबत पुष्पा 2 चित्रपट सुमारे 50 टक्क्यांनी मागे आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :