बिग बॉस 18 ची ट्रॉफी हातून निसटली, 'BB का लाडला' विवियन डिसेना म्हणाला, "माझा नियतीवर विश्वास, माझ्या नशिबात..."
Vivian Dsena on Karan Veer Mehra : बिग बॉस 18 मधील उपविजेत्या विवियन डिसेना याने पराभवानंतर दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Bigg Boss 18 Winner : बिग बॉस सीझन 18 च्या ट्रॉफीवर करणवीर मेहरा याने नाव कोरलं आहे. करणवीर मेहरा बिग बॉस सीझन 18 चा विजेचा ठरला, तर विवियन डिसेना या सीझनचा उपविजेता ठरला. विवियन डिसेना बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सामील झाल्यापासूनच त्याची जोरदार चर्चा होती. तो बिग बॉस आणि प्रेक्षकांचाही लाडका झाला होता. प्रेक्षकांनी त्याला 'BB का लाडला' असं नाव दिलं होतं.
विवियन डिसेना बिग बॉस 18 चा उपविजेता
बिग बॉस सीझन 18 च्या विजेतेपदासाठी करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्या नावाची चर्चा सुरु होती, पण अखेर करणने बाजी मारली. बिग बॉस 18 ची चॅम्पियन ट्रॉफी निसटल्यानंतर विवियनने मीडियासमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. 'करणच्या नशिबात ट्रॉफी होती, तो जिंकला, माझ्या नशिबात लोकांचं प्रेम आहे', असं विवियनने म्हटलं आहे.
"माझा नियतीवर विश्वास, माझ्या नशिबात..."
विवियन डिसेनाने म्हटलं की, "मी नेहमीच म्हटलंय, माझा नियतीवर विश्वास आहे. त्याच्या नशिबात ट्रॉफी होती, तो घेऊन गेला, माझ्या नशिबात लोकांचं प्रेम आहे, जे मला भरपूर मिळालंय. बिग बॉसच्या घरात इतके दिवस राहिल्यानंतर ट्रॉफी जिंकावी, असं प्रत्येकाला वाटतं. ते स्पर्धकापेक्षा त्याच्या चाहत्यांसाठी फार महत्त्वाचं असतं, जे चाहते-प्रेक्षक तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यावर मोठा प्रश्न होतो. मला असं वाटतं की, प्रत्येक व्यक्तीला, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आशावादी असलं पाहिजे, बाकी आयुष्यात चढ-उतार तर होतंच राहतात".
"या दु:खासाठी माझ्या मनात..."
बिग बॉस 18 ची ट्रॉफी न मिळाल्यामुळे दु:ख झालं का, या मीडियाच्या प्रश्नाला उत्तर देताना विवियन म्हणाला, "माझा प्रवास आणि करियर माझ्यापेक्षा जास्त माझ्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी जवळून पाहिलं आहे. मला माझ्या आयुष्यात कोणत्याची गोष्टीच दु:ख नाही. त्यामुळे या दु:खासाठी माझ्या मनात मुळीच स्थान नाही, मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात मला आतापर्यंत जे मिळालं आणि सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे, ते लोकांमुळे आणि ईश्वराच्या आर्शिवादामुळे आहे. मी माझे चाहते आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो".
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :