एक्स्प्लोर
VIDEO : 'बाबा'... प्रियंका चोप्राची मराठी गाण्यातून आर्त साद
मुंबई : 'व्हेंटिलेटर' चित्रपटाची निर्मिती करत अभिनेत्री प्रियंका चोप्राने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आता याच चित्रपटातून प्रियंका मराठी पार्श्वगायनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. प्रियंकाने गायलेलं 'बाबा' हे गाणं यूट्यूबवर रिलीज झालं आहे.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'व्हेंटिलेटर' चित्रपटात जितेंद्र जोशी, सुकन्या कुलकर्णी, सतीश आळेकर, सुलभा आर्य, स्वाती चिटणीस अशा दिग्गज कलाकारांची फौज आहे. प्रियंकाही या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जातं.
'क्वांटिको' सारख्या आंतरराष्ट्रीय मालिकेत झळकलेल्या प्रियंकाने बॉलिवूडमध्ये एकही नवा प्रोजेक्ट हाती घेतलेला नाही. 'बाजीराव मस्तानी'नंतर मोठ्या पडद्यावर तिचं दर्शन घडलेलं नाही. त्यामुळे प्रियंकाच्या चाहत्यांना तिला पाहण्याची आणि ऐकण्याची उत्सुकता लागली आहे.
प्रियंकाचे वडील अशोक चोप्रा यांचं 2013 मध्ये कर्करोगाने निधन झालं. त्यामुळे गाणं गाताना प्रियंकाही वडिलांच्या आठवणीने भावुक झाली होती. 'डॅडीज् गर्ल' असा टॅटू प्रियंकाने तिच्या हातावरही गोंदवला आहे. 'बाबा' हे गाणं तमाम पितृवर्गाला समर्पित करत असल्याचं प्रियंका सांगते.
'कळले' यासारखे मराठी शब्द गाण्यासाठी तिने उच्चारांवर मेहनत घेतल्याचं व्हिडिओत दिसतं. प्रियंका चोप्राच्या आवाजातलं 'बाबा' हे गाणं ऐकून अनेकांनी मनाला स्पर्शून गेल्याची भावना व्यक्त केली आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement