एक्स्प्लोर
जेम्स बॉण्ड पान मसाल्याच्या जाहिरातीत, ट्विटरवर जोक्सचा धुमाकूळ
मुंबई : 'माय नेम इज बॉण्ड, जेम्स बॉण्ड,' हा डायलॉग बोलणारा जेम्स बॉण्ड म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर त्याचा स्टायलिश लूक आणि डॅशिंग अंदाज समोर येतो. मात्र ह्याच बॉण्डच्या हातात आता पान मसाल्याचा डब्बा दिसत आहे.
जेम्स बॉण्ड 007' सीरिजच्या 'गोल्डन आय', 'टुमॉरो नेव्हर डाइज', 'डाय अनदर डे' या सिनेमात जेम्स बॉण्डची भूमिका साकारणारा पीअर्स ब्रॉसनन चक्क पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसणार आहे. हा कुठलाही आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड नाही तर पान बहार या भारतीय कंपनीच्या जाहिरातीत ब्रॉसनन दिसणार आहे.
पान बहार ही स्वातंत्र्यपूर्व काळातील कंपनी आहे. याआधी या कंपनीच्या जाहिरातीमध्ये फरदीन खान आणि सैफ अली खान झळकत होते. मात्र आता पीअर्स ब्रॉसनन पान बहारची जाहिरात करत आहे. पीअर्स ब्रॉसनन या जाहिरातीत ब्लॅक ब्लेझर, करडे केस आणि दाढी-मिशीत दिसत आहे.
पीअर्स ब्रॉसननने या जाहिरातीसाठी तब्बल 13 कोटी रुपये घेतल्याचं कळतं.
जाहिरात ट्विटरवर ट्रेण्ड
मात्र ही जाहिरात पाहिल्यानंतर लोकांनी ती सोशल मीडियावर शेअर केली. Pierce Brosnan आणि James Bond ट्विटरवर ट्रेण्ड होऊ लागले. ट्विपल्सनी या जाहिरातीची, पीअर्स ब्रॉसननची खिल्ली उडवली
ट्विटरवर एकाने लिहिलं आहे की, "जेम्स बॉण्ड आपल्या सिंघमप्रमाणे पान मसाल्याची जाहिरात करत आहे. हॉलिवूड आता बॉलिवूडची कॉपी करत आहे. अच्छे दिन"
तर आणखी एका युझरने लिहिलं आहे की, "म्हणून तुम्हाला निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पैसे बचत करायला हवे."
https://twitter.com/akkshaynagde/status/784259611444391937
पीअर्स ब्रॉसनन आता बोलणार : "माय नेम इज बॉण्ड (पान बहार थुंकणार) जेम्स बॉण्ड," असं गौतम वर्मा नावाच्या ट्विटर हॅण्डलवर लिहिलं आहे.
https://twitter.com/gautamverma23/status/784312493883613184
पाहा जाहिरात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement