(Source: Poll of Polls)
Mumbai : अभिनेत्रीचा सहकलाकारावर अत्याचाराचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
Mumbai : छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने तिच्या सहकलाकारावर लग्नाचं आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
Mumbai : मुंबईतील गोरेगाव भागात राहणाऱ्या छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने (Actress) तिच्या सहकलाकारावर लग्नाचं आश्वासन देऊन बलात्कार (Mumbai actress rape case) केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर अभिनेत्याने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. पण ही याचिका न्यायालयाने फेटाळली त्यामुळे अभिनेत्याने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे.
अभिनेत्री म्हणाली...
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं की,"गेल्या 9 महिन्यांसोबत मी माझ्या सहकलाकारासोबत रिलेशनमध्ये होते. आमच्यात सर्व काही ठीक सुरू होतं. पण एकदिवस मला वाटलं की तो आणखी कोणाला तरी डेट करत आहे. त्यानंतर मी त्याला यासंदर्भात विचारलं असता आमच्यात फक्त मैत्री आहे, असं त्याने मला सांगितलं. आम्ही रिलेशनमध्ये असतानाच त्याच्या आजीचे निधन झाले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी तो माझ्याकडे पैसे मागत राहिला".
अभिनेत्री म्हणाली,"त्याच्या वाढदिवशी मी जेव्हा त्याच्या घरी गेले तेव्हा एक मुलगी त्याच्या घरी होती आणि तिने मला घरी जायला सांगितलं. त्यावेळी माझ्या बॉयफ्रेंडला भेटण्यापासून, त्याच्या घरी येण्यापासून, त्याचा वाढदिवस मला साजरा करू देण्यापासून ही मुलगी रोखत असल्याने मला खूप मोठा धक्का बसला".
अभिनेत्री पुढे म्हणाली,"वाढदिवसाला घडलेल्या प्रकाराबद्दल दोघांनीही नंतर मेसेज करत माझी माफी मागितली. पण मला मिळालेल्या माहितीनुसार ती मुलगी आणि माझा बॉयफ्रेंड एकाच घरात राहतात. त्यानंतर यासंदर्भात जेव्हा मी बॉयफ्रेंडला विचारलं तेव्हा त्याने मला ही गोष्ट कोणालाही न सांगण्याचा सल्ला दिला".
अभिनेत्याचे वकील म्हणाले...
अभिनेत्याचे वकील शैलेंद्र मिश्रा एबीपी न्यूजला माहिती देत म्हणाले,"अभिनेत्रीने केलेले आरोप खोटे आहेत. अभिनेत्रीने याआधी लेखी तक्रार दाखल केली होती. त्यावेळी या आरोपांचा उल्लेख केला नव्हता. पण अभिनेत्याने अभिनेत्री विरोधात लेखी तक्रार दाखल केली त्यात ती ब्लॅकमेल करत असल्याचं त्याने म्हटलं होतं.
शैलेंद्र मिश्रा पुढे म्हणाले,"अभिनेत्रीने त्याच्याविरोधात आता आणखी एक तक्रार दाखल करत बलात्काराचा आरोप केला. अभिनेत्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. अभिनेता निर्दोष सिद्ध होईल आणि अभिनेत्रीवर योग्य ती कारवाई केली जाईल. आम्ही लढत राहू, हार मानणार नाही. उच्च न्यायालयात जाऊन अभिनेत्याला न्याय मिळवून देणार".
संबंधित बातम्या