Met Gala 2023: हॉलिवूड सेलिब्रिटींची 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर हवा; आऊफिटनं वेधलं लक्ष
हॉलिवूडबरोबरच बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील मेट गाला इव्हेंटमध्ये (Met Gala 2023) हजेरी लावली.
Met Gala 2023: मेट गाला (Met Gala 2023) हा इव्हेंट दरवर्षी आयोजित केला जातो. यावर्षी देखील या इव्हेंटचे आयोजन करण्यात आलं होतं. वेगवेगळ्या सेलिब्रिटींनी मेट गाला इव्हेंटच्या रेड कार्पेटवर वॉक केला. हॉलिवूडबरोबरच बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील मेट गाला इव्हेंटमध्ये हजेरी लावली. यामधील काही सेलिब्रिटींच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
लिल नास एक्सचा हटके लूक
रॅपर लिल नास एक्सनं मेट गालामध्ये हजेरी लावली. यावेळी लिलनं संपूर्ण अंगावर सिल्वर पेंट लावला होता. तसेच त्याच्या अंगावर काही मोती आणि खडे देखील लावण्यात आले होते. लिल नास एक्सनं मेट गालासाठी केलेल्या लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
Lil Nas X for the 2023 #MetGala.
— Pop Base (@PopBase) May 2, 2023
pic.twitter.com/lgYWXIy4Gu
जेरेड लेटोचा आऊटफिट (Jared Leto)
मेट गाला 2023 मध्ये जेरेड लेटोने निळे डोळे असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या फ्लफी मांजरीचा लूक केला होता.त्याच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
Jared Leto เว่อร์มาก แมวเหมียว แมวใจสุดๆ กินรวบคนเดียวไม่แบ่งใคร 🐱⭐ pic.twitter.com/MvBomj1mb3
— 𝗅𝗈𝗅𝗂𝖿𝗋𝗈𝗒𝖽 🤍ꔚ (@_lolifroyd) May 2, 2023
रेहानानं देखील लावली हजेरी
रेहानानं मेट गालाच्या रेड कार्पेटवर वॉक केला. तिच्या एका आऊटफिटमध्ये तिनं बेबी बंप फ्लॉन्ट केला. तर दुसऱ्या आऊटफिटमध्ये रेहानाचा क्लासी अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळाला. यावेळी रेहानासोबत रॅपर असॅप रॉकी देखील दिसला.
View this post on Instagram
'या' सेलिब्रिटींनी देखील लावली हजेरी
जेना ऑर्टेगा, किम कार्दशियन, रोझे या सेलिब्रिटींनी देखील मेट गाला इव्हेंटमध्ये हजेरी लावली. तसेच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या देखील मेट गाला इव्हेंटमध्ये उपस्थित होत्या. 'मेट गाला इव्हेंट' मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने पांढऱ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. तर प्रियांकाने 'मेट गाला इव्हेंट'साठी खास लूक केला होता. तिच्या ब्लॅक अँड व्हाईट लूकनं अनेकांची मनं जिंकली. प्रियांकानं पती निक जोनाससोबत मेट गाला इव्हेंटमध्ये हजेरी लावली. प्रियांका आणि निकच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
संबंधित बातम्या