Met Gala 2023 : 'मेट गाला इव्हेंट'मध्ये 'गंगूबाई' अन् 'देसी गर्ल'चा जलवा! आऊटफिटची किंमत जाणून व्हाल थक्क...
Bollywood Actress : 'मेट गाला इव्हेंट'मध्ये प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टने आपल्या खास लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
![Met Gala 2023 : 'मेट गाला इव्हेंट'मध्ये 'गंगूबाई' अन् 'देसी गर्ल'चा जलवा! आऊटफिटची किंमत जाणून व्हाल थक्क... Met Gala 2023 bollywood actress Priyanka Chopra Alia Bhatt spotted Met Gala event see photo details Met Gala 2023 : 'मेट गाला इव्हेंट'मध्ये 'गंगूबाई' अन् 'देसी गर्ल'चा जलवा! आऊटफिटची किंमत जाणून व्हाल थक्क...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/16f0152d1deb2d2f90b1c90933f710021683001999401254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Priyanka Chopra Alia Bhatt On Met Gala 2023 : जगभरातील फॅशन डिझाईनर्ससाठी महत्त्वाचा असणारा 'मेट गाला इव्हेंट' (Met Gala 2023) नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
'मेट गाला इव्हेंट'मध्ये गंगूबाईचा जलवा!
'मेट गाला इव्हेंट' मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने पांढऱ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत. 'मेट गाला इव्हेंट'च्या माध्यमातून आलियाने हॉलिवूडकरांना घायाळ केलं आहे. आलियाचे रेड कार्पेटवरील पांढऱ्या मोत्यांचा गाऊन परिधान केलेले फोटो व्हायरल होत आहेत. आलिया पहिल्यांदाच 'मेट गाला इव्हेंट'मध्ये सहभागी झाली होती.
View this post on Instagram
प्रियांकाचा किलर अंदाज
बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांवर भूरळ पाडणाऱ्या प्रियांकाने 'मेट गाला इव्हेंट'साठी खास लूक केला होता. तिचा किलर अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 'मेट गाला इव्हेंट'मध्ये प्रियांकाने निक जोनाससोबत हजेरी लावली. 'मेट गाला इव्हेंट'च्या रेड कार्पेटवर अभिनेत्रीने हाय स्लिट ऑफ शोल्डर आउटफिट घातला होता. तसेच आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने खास हिऱ्यांचा हारदेखील घातला होता.
Her $25 million @Bulgariofficial necklace is going to be auctioned off after #MetGala @priyankachopra pic.twitter.com/LK0otVUHea
— SAMBIT ⚡ (@GirlDontYell) May 2, 2023
'मेट गाला इव्हेंट 2023'मध्ये प्रियांकाने 11.6 कॅरेटचा हिऱ्यांचा हार घातला होता. या हाराची किंमत 204 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे आलिया भट्टने घातलेल्या गाउनवर 1 लाख मोती होती. त्यामुळे तिनेदेखील या इव्हेंटसाठी कोट्यवधी रुपयांचा गाउन परिधान केला असल्याचं समोर आलं आहे.
प्रियांकाची 'सिटाडेल' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. थरार-नाट्य असणाऱ्या या वेबसीरिजची जगभर चर्चा आहे. लवकरच तिचा 'जी ले जरा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. तर आलियाचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
संबंधित बातम्या
Met Gala 2022 : साडी अन् मेटल corset ; 'मेट गाला 2022' साठी नताशा पूनावालाचा खास लूक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)