एक्स्प्लोर

Mahesh Manjarekar : 'मी उत्तम सिनेमा केला असता पण रणदीप हुड्डाने...' , 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट सोडण्याचं महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण

Mahesh Manjarekar : स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट का सोडला याविषयी महेश मांजरेकर यांनी भाष्य केलं आहे.

Mahesh Manjarekar :  काही दिवसांपूर्वी आलेल्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा चित्रपट येण्याआधी ते आल्यानंतर अनेक मुद्द्यांना तोंड फुटलं होतं. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने बऱ्यापैकी कमाई केली. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रणदीप हुड्डानं (Randeep Hooda) केलं आहे. त्यामुळे त्याचा हा चित्रपट काढण्यामागे प्रोपोगांडा असल्याचं देखील म्हटलं जात होतं. पण या सिनेमाच्या आधी एक वेगळीच चर्चा रंगली होती. दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी हा चित्रपट करण्याचं ठरवलं होतं, पण त्यांनी अर्ध्यातूनच हा सिनेमा सोडला. 

सावरकर चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रणदीपने ज्या मुलाखती दिल्या त्यापैकी अनेक मुलाखतींमध्ये त्याला देखील याबाबत विचारण्यात आलं. पण मांजरेकरांनी हा चित्रपट का सोडला याविषयी त्याने भाष्य करणं टाळल्याचं पाहायला मिळालं. मांजरेकरांनी हा चित्रपट सोडल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. सावरकरांचे विचार पटत नाहीत अशा प्रकारची टीका देखील त्यांच्यावर करण्यात आली. पण आता या सगळ्यावर महेश मांजरेकर यांनी भाष्य केलं आहे. 

मी उत्तम सिनेमा केला असता - महेश मांजरेकर

 वीर सावरकरांच्या चित्रपटाला जस्टिफाय केलं नाही तर तो चित्रपट का बनवायचा? त्यात जर रणदीप हुड्डा नसता तर मी उत्तम सिनेमा केला असता, असंही महेश मांजरेकर यांनी म्हटलं. रणदीप हुड्डाने वीर सावरकरांबद्दल वाचलं नाही का? तसं मुळीच नाही त्याने माझ्या तीनपट सावरकर वाचले आहेत. प्रॉब्लेम हा झाला की त्याने सगळंच वाचलं. मी वीर सावरकर चित्रपट का सोडेन? मला करायचा होता सिनेमा. पण या सगळ्या परिस्थितीमुळे मी तो केला नाही, असं स्पष्टीकरणही यावेळी त्यांनी दिलं. 

म्हणून मांजरेकरांनी सोडला सावरकर चित्रपट

महेश मांजरेकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसत्ता अड्डामध्ये या विषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी म्हटलं की,  मला सावरकरांविषयी प्रचंड आकर्षण आहे. पण खरं सांगायचं तर ज्यांन हा सिनेमा केलाय, त्यांना त्याच्याशी काही घेणंदेणं नव्हतं. मला कायम वाटायचं की आपण सावरकरांवर चित्रपट करायला हवा. त्यासाठी मग संदीप सिंह निर्माता होता, तो आला. मग रणदीप हुड्डाला घ्यायचं ठरलं. रणदीप हुड्डाला सावरकर काळे की गोरे हे ही माहिती नव्हतं. पण त्यासाठी त्याने संपूर्ण इतिहास वाचून काढला आणि हे त्याचं श्रेय आहे. आधी त्याला वाटलं होतं की सावरकर व्हिलन आहेत. मग मी त्याला सांगितलं की तू आधी सगळं वाचून काढ. त्यामुळे या चित्रपटातील 70 टक्के स्क्रिप्ट हे माझं आहे. पहिल्या वाचनाला त्याने सांगितलं हे हवं आहे, ते हवं आहे. त्यानंतर तो हस्तक्षेप करु लागला.  स्क्रिप्ट लॉक होईना, शूट थांबलं होतं. बजेट वाढू लागलं होतं. मला तर वाटलं की मी मरेन. कारण चित्रपट वाईट झाला तर लोक मला नावं ठेवतील.

त्यानंतर मी ठरवलं... - महेश मांजरेकर

त्यानंतर इतकी नकारात्मक परिस्थिती निर्माण होऊ लागली की मी शेवटी निर्मात्यांना सांगितलं की, एकतर रणदीप हुड्डाला तो सिनेमा करु दे किंवा मी करतो. त्यानंतर तो दिग्दर्शनाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करु लागला. एक दिवस त्याने माझ्या हातात  स्क्रिप्ट ठेवलं आणि म्हणाला की ही सव्वा दोन तासांची स्क्रिप्ट आहे. मी म्हटलं माझ्याकडे साडेचार तासांची स्क्रिप्ट आहे. रणदीपला भेटायला जावं तर तो वीर सावरकरांच्या वेशात बसलेला असायचा, मी त्याच्यातल्या अभिनेत्याशी संवाद कधी साधायचा? मग मला वाटू लागलं की तो (रणदीप हुड्डा) जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी करत होता. मग निर्मात्याला सांगितलं की तू त्याला निवड किंवा मला निवड कारण मला हवाय तसा चित्रपट रणदीपसोबत होऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं. 

ही बातमी वाचा : 

Chinmay Mandlekar : 'मतदार लोकशाहीची सर्वात जास्त ठासतात', चिन्मय मांडलेकरनं स्पष्टचं म्हटलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसलेRavindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget