Kabir Singh Sequel : शाहीद कपूरच्या 'कबीर सिंह'चा येणार सिक्वेल, निर्मात्यांनी दिली माहिती
Kabir Singh Sequel : शाहीद कपूरच्या 'कबीर सिंह'ने बॉक्सऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. लवकरच या सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Kabir Singh Sequel : शाहीद कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'कबीर सिंह' (Kabir Singh) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला होता. हा सिनेमा 250 कोटींच्या क्लबमध्ये सामिल झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 'कबीर सिंह'नंतर भूषण कुमार आणि मुराद खेतानी या जोडीने 'भूल भुलैया 2' हा सिनेमावर लक्ष केंद्रीत केले. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. दरम्यान भूषण कुमार यांनी 'कबीर सिंह'च्या सिक्वेलसंदर्भात माहिती दिली आहे.
'कबीर सिंह 2','आशिकी 3' आणि 'भूल भुलैया 3'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
एका मुलाखतीत भूषण कुमार म्हणाले, कबीर सिंहचे पात्र प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले होते. हा सिनेमादेखील सिनेप्रेक्षकांना आवडला होता. त्यामुळेच आता 'कबीर सिंह'च्या सिक्वेलसंदर्भात विचार सुरू आहे. भूषणच्या या वक्तव्यावर मुराद खेतानींनीदेखील संमती दर्शवली आहे. मुराद खेतानी म्हणाले, 'कबीर सिंह'चा सिक्वेल येऊ शकतो. 'कबीर सिंह 2','आशिकी 3' आणि 'भूल भुलैया 3'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. योग्यवेळ आली की अधिकृत घोषणा करण्यात येईल."
'कबीर सिंह' हा 'अर्जुन रेड्डी' या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे. भूषण कुमार आणि मुराद खेतानीचा 'अॅनिमल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणबीर सिंह, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत असणार आहेत. संदीप रेड्डी वांगा या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.
2019 मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
वीस दिवसांमध्ये 'कबीर सिंह'ने 246.28 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. यासोबतच विकी कौशलच्या 'उरी' सिनेमाचा विक्रम मोडित काढत 'कबीर सिंह' हा 2019 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. शाहीदसह कियारा अडवाणी, सुरेश ओबेरॉय, निकिता दत्ता, अर्जन बाजवा, कामिनी कौशल यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या.
अर्जुन रेड्डीमध्ये अभिनेता विजय देवराकोंडा याने मुख्य भुमिका साकारली होती. त्याच भुमिकेत शाहिद कपुर दिसणार आहे. तर अभिनेत्री कियारा अडवाणीने या सिनेमात शाहिद कपूरच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन संदीप वांगा यांनी केलं आहे. अर्जुन रेड्डी या सिनेमाचं देखील लेखन/दिग्दर्शन संदीप यांनीच केलं आहे.
संबंधित बातम्या