नवीन वर्षात रणबीर कपूरच्या 'या' चित्रपटाची घोषणा, 'कबीर सिंह' फेम संदीप रेड्डींचं दिग्दर्शन
नवीन वर्षात रणबीर कपूरच्या (Ranbeer Kapoor) चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. 'कबीर सिंह' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या पुढील सिनेमात रणबीर कपूर झळकणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'अॅनिमल'.
मुंबई : नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात करण्यात आलं आहे. या नवीन वर्षात रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. 'कबीर सिंह' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या पुढील सिनेमात रणबीर कपूर झळकणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'अॅनिमल'.
'अॅनिमल' च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या व्हिडीओला रणबीर कपूरचा आवाज आहे आणि तो आपल्या वडिलांबाबत सांगत आहे. व्हिडीओवरुन अंदाज लावला जात आहे की, हा एक फॅमिली ड्रामा आहे. या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, बॉबी देओल आणि परिणीती चोप्रा हे कलाकार देखील दिसणार आहेत. अनिल कपूरने चित्रपटाचा टीजर आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. अनिल कपूरनं म्हटलं आहे की, या नव्या प्रवासाच्या सुरुवातीसाठी उत्सुक आहे.
Oh boy! The new year just gets better with this whistle!😉 Presenting, #Animal, can't wait for our journey to begin.#RanbirKapoor @ParineetiChopra @thedeol @imvangasandeep @VangaPranay #BhushanKumar #KrishanKumar @MuradKhetani #TSeriesFilms pic.twitter.com/AHPoGFVGSn
— Anil Kapoor (@AnilKapoor) December 31, 2020
या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर याचा संवाद असा आहे की, "पापा, पुढील जन्मी तुम्ही माझा मुलगा बना, मग पाहा मी तुमच्यावर कसं प्रेम करतो आणि तुम्ही शिका. कारण त्याच्या पुढच्या जन्मात मी पुन्हा तुमचा मुलगा असेल. तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रेम करा, माझ्यासारखं नाही. पापा, तुम्हाला कळतंय ना, तुम्हाला कळलं तरी पुरेसं आहे."
भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांची टी-सीरिज, प्रणय रेड्डी वांगा यांचं भद्रकाली पिक्चर्स आणि मुराद खेतानी याचं सिने1स्टूडिओज या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.