'कबीर सिंग'ची रेकॉर्डब्रेक कमाई, सलमान, अक्षय कुमारलाही टाकलं मागे
सिनेमाची ज्या वेगाने यशस्वी घोडदौड सुरु आहे, त्यानुसार सिनेमा नवव्या दिवशी 150 कोटींच्या क्लबमध्ये सामिल होईल, असा दावा अनेकांकडून केला जात आहे.
मुंबई : शाहीद कपूरच्या 'कबीर सिंग' सिनेमाला दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या वर्षातील मोठ्या हिट सिनेमांमध्ये समावेश होण्याच्या दिशेने सिनेमाची वाटचाल होत आहे. कबीर सिंग सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी 12.21 कोटींची बक्कळ कमाई केली आहे.
सिनेमाने गेल्या आठ दिवसात एकूण 146.63 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाची ज्या वेगाने यशस्वी घोडदौड सुरु आहे, त्यानुसार सिनेमा नवव्या दिवशी 150 कोटींच्या क्लबमध्ये सामिल होईल, असा दावा अनेकांकडून केला जात आहे.
कबीर सिंगच्या 2019 मधील हिट सिनेमांच्या तुलनेनं दुसऱ्या शुक्रवारी सर्वाधिक कमाई केली आहे. दुसऱ्या शुक्रवारी कबीर सिंगने 12.21 कोटींची कमाई केली आहे. तर 'उरी'ने दुसऱ्या शुक्रवारी 7.66 कोटींची कमाई केली होती. तर अजय देवगनच्या 'टोटल धमाल'ने दुसऱ्या शुक्रवारी 4.75 कोटींची कमाई केली होती.
या यादीत चौथ्या स्थानावर अक्षय कुमारचा 'केसरी' सिनेमा आहे. केसरीने दुसऱ्या शुक्रवारी 4.45 कोटींची कमाई केली होती. तर सलमान खानच्या 'भारत'ने दुसऱ्या शुक्रवारी 4.30 कोटींची कमाई केली होती.
'कबीर सिंग' गेल्या शुक्रवारी म्हणजे 21 जून रोजी प्रदर्शित झाला होता. देशात जवळपास 3123 स्क्रिन्सवर सिनेमा एकाचवेळी प्रदर्शित झाला होता. तर परदेशात एकूण 493 स्क्रिन्सवर सिनेमा प्रदर्शित झाला होता. दाक्षिणात्य सिनेमा 'अर्जुन रेड्डी' सिनेमाचा हा रिमेक आहे. सिनेमाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगाने केलं आहे. अर्जुन रेड्डी सिनेमाचं दिग्दर्शनही संदीपनेच केलं होतं.
Movie Review | कबीर सिंह - बाणावर खोचलेल्या प्रेमाची गोष्ट | पिक्चर बिक्चर | ढॅण्टॅढॅण | ABP Majha