Jhimma : 'झिम्मा'ची सिनेमागृहात शंभरी, 15 व्या आठवड्यात केले पदार्पण
Jhimma Movie : 'झिम्मा' सिनेमा 19 नोव्हेंबर 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
![Jhimma : 'झिम्मा'ची सिनेमागृहात शंभरी, 15 व्या आठवड्यात केले पदार्पण Jhimma: 'Jhimma' debuted in 100th, 15th week in cinemas Jhimma : 'झिम्मा'ची सिनेमागृहात शंभरी, 15 व्या आठवड्यात केले पदार्पण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/26/7da060d475c9d61f665787ed3c8125bb_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jhimma : सिनेमागृहे सुरू झाल्यापासून बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमे एकामागून एक प्रदर्शित होत आहेत. या स्पर्धेत मराठी सिनेमेदेखील मागे राहिलेले नाहीत. लॉकडाऊन नंतर प्रदर्शित झालेला झिम्मा हा पहिलाच सिनेमा आहे. या शर्यतीत बॉलिवूडचे अनेक सिनेमे असताना देखील 'झिम्मा' ने आपली घोडदौड कायम ठेवली. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या सिनेमाने सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण केले आहेत.
'झिम्मा' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होऊन 100 दिवस पूर्ण झाले असून सिनेमाने आता 15 व्या आठवड्यात पदार्पण केले आहे. बऱ्याच वर्षांनी मराठी सिनेमाने अशी गौरवास्पद कामगिरी केली आहे. कोरोनाकाळात या सिनेमाने 15 कोटींची कमाई केली आहे. 'झिम्मा' या चित्रपटाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवण्यात आला आहे. ॲमेझॉन प्राईम वर भारतातील पहिल्या पाच चित्रपटांमध्ये स्थान मिळवण्याचा बहुमान 'झिम्मा'ने पटकावला आहे. आजही झिम्मा सर्वत्र ट्रेडिंगमध्ये आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' 19 नोव्हेंबर 2021 ला प्रदर्शित झाला. हा सिनेमा महाराष्ट्रातील महिल्यांच्या पसंतीस पडत आहे.
'झिम्मा'च्या रेकॉर्डब्रेक कामगिरीबद्दल क्षिती जोग म्हणाली,"लॉकडाऊननंतर मराठी सिनेमांचे काय होणार, अशी नकारात्मक चर्चा सुरू असताना 'झिम्मा' प्रदर्शित करण्याचे धाडस केले. आजही चित्रपटगृहांमध्ये 'झिम्मा'ची यशस्वी घोडदौड सुरू असून शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. मुख्य बाब म्हणजे हा सिनेमा लॉकडाऊनच्या नंतर चित्रपटगृहांची दारे उघडणारा चित्रपट ठरला आहे.
'झिम्मा' सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे.
संबंधित बातम्या
Ajay-Atul : अजय-अतुलच्या संगीत मैफिलची मेजवानी आता घरबसल्या, 'मराठी भाषा दिनी' रंगणार भव्य संगीत सोहळा
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई
Russia Ukraine Conflict : आरआरआर ते 2.0 या प्रसिद्ध बॉलीवुड चित्रपटांचं शूट युक्रेनमध्ये, वाचा यादी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)