Ajay-Atul : अजय-अतुलच्या संगीत मैफिलची मेजवानी आता घरबसल्या, 'मराठी भाषा दिनी' रंगणार भव्य संगीत सोहळा
Marathi Bhasha Din : 'मराठी भाषा दिना'निमित्त अजय-अतुलच्या आवाजातील मराठी गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत.
Ajay-Atul : अजय अतुलच्या संगीतावर अवघा महाराष्ट्र थिरकणार आहे. 'अप्सरा आली', 'वाजले की बारा', 'झिंग झिंग झिंगाट' अशी अनेक गाणी मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येणारी जोडी म्हणजे अजय-अतुल. अजय-अतुलच्या आवाजातील हीच गाणी पुन्हा एकदा ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. कलर्स मराठीवर मराठी भाषा दिनानिमित्त भव्य संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अजय - अतुल त्यांच्या संगीत कारकिर्दीतील काही निवडक आणि लोकप्रिय गाणी संगीत सोहळ्यात सादर करणार आहेत. या कार्यक्रमात प्रेक्षकांना निखळ संगीताचा आनंद घेता येणार आहे. बर्याच कालावधीनंतर सुरेल संगीत संध्याकाळ प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. भारतीय संगीताला अजय-अतुल या जोडीने सातासमुद्रापलीकडे नेले आहे.
View this post on Instagram
अजय-अतुल या जोडीची संगीत मैफल प्रेक्षकांना घरबसल्या ऐकायला मिळणार आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना अजय अतुलच्या संगीत कारकीर्दीतील अनेक गाजलेली गाणी ऐकायला मिळणार आहेत. नटरंग सिनेमातील 'नटरंग उभा', 'अगं बाई अरेच्चा' सिनेमातील 'मल्हारवारी', 'दुर्गे दुर्गट भारी' 'सावरखेड एक गाव' चित्रपटातील 'आई भवानी' अशी लोकप्रिय गाणी या कार्यक्रमात सादर होणार आहेत. अजय अतुल यांच्या गाण्यांनी फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीला देखील एकापेक्षा एक सुमधुर गाणी देऊन भुरळ घातली आहे.
संबंधित बातम्या
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई
Hrithik Roshan : ह्रतिकनं शेअर केली सबासाठी खास पोस्ट ; सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकांना अटकेपासून कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha