Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल
Janhvi Kapoor Hospitalised : अभिनेत्री जान्हवी कपूर हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची तब्येत बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
![Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल janhvi kapoor hospitalized in mumbai due to food poisoning discharge on friday bollywood entertainment marathi news Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/18/596529805cdfcc0ee710e45cd24d848f1721307347218322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Actress Janhvi Kapoor Hospitalised : अभिनेत्री जान्हवी कपूरची (Janhvi Kapoor) तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जान्हवी कपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जान्हवी कपूरला मुंबईतील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. एबीपीने जान्हवी कपूरच्या कुटुंबियांसंबंधित सूत्रांकडून या बातमीची पुष्टी केली आहे. जान्हवी कपूरला मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल
जान्हवी कपूरची तब्येत बिघडल्याने तिला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. जान्हवीला फूड पॉयझनिंग झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जान्हवी कपूरला अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. जान्हवी कपूरच्या कुटुंबातील सूत्रांकडून एबीपीला ही माहिती मिळाली आहे.
जान्हवीची अचानक तब्येत बिघडली
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी कपूर चेन्नईला गेली होती. चेन्नईहून परतताना जान्हवीने विमानतळावर काहीतरी खाल्लं ज्यातून तिला विषबाधा झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विमानतळावरुन घरी आल्यानंतर जान्हवीची प्रकृती खालावली होती आणि बुधवारी तिला खूप अशक्तपणा जाणवत होता. जान्हवीची तब्येत बिघडल्याने आणि अशक्तपणा जाणवत असल्याने तिला गुरुवारी डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जान्हवीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज कधी मिळणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवी कपूरला अन्नातून विषबाधा झाली होती. त्यामुळे तिला गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जान्हवीची प्रकृती सध्या ठीक आहे. तिला शुक्रवारपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
वडील बोनी कपूर यांनी दिली माहिती
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याचे वडील बोनी कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मीडियाशी बोलताना बोनी कपूर यांनी सांगितलं की, जान्हवीची प्रकृती आता ठीक आहे आणि ती एक-दोन दिवसांत बरी होईल. त्यानंतरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून जान्हवीची तब्येत ठीक नव्हती, त्यानंतर तिला गुरुवारी रुग्णालयात दाखल करावे लागले.
गेले काही आठवडे जान्हवीसाठी खूपच व्यस्त होते. मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या सर्व कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. अंबानींच्या कार्यक्रमात जान्हवीच्या लूकची खूप प्रशंसा झाली. जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'उलझ' चित्रपटामुळे चर्चेत आहे. याचित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला. यामध्ये जान्हवी सुहाना या IFS अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Urvashi Rautela : उर्वशीचा कपडे बदलतानाचा VIDEO व्हायरल, मॅनजरला झापलं, ऑडिओ क्लिप समोर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)