(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pippa Teaser: 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित 'पिप्पा' चा दमदार टीझर रिलीज; ईशान खट्टर अन् मृणाल ठाकूरची प्रमुख भूमिका
'पिप्पा' (Pippa) या चित्रपटाचे कथानक 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.
Pippa Teaser : आज स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिनेता ईशान खट्टर (Ishaan Khatter) आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांच्या 'पिप्पा' (Pippa) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये दिसत आहे की, या चित्रपटाचे कथानक 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. चित्रपटाची कथा ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांच्या 'द बर्निंग चाफीज' या पुस्तकावर आधारित आहे.
पिप्पा चित्रपटाचा टीझर हा 1 मिनिट 07 सेकंदाचा आहे. या टीझरमध्ये 3 डिसेंबर 1971 रोजी देशातील सैनिक हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं भाषण ऐकताना दिसत आहेत. या भाषणामध्ये इंदिरा गांधी या पाकिस्तानसोबत युद्धाची घोषणा करतात. पिप्पा हा चित्रपट 2 डिसेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
राजा कृष्ण मेनन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिप्पा या चित्रपटात ईशान खट्टर हा कॅप्टन बलराम सिंह मेहता यांची भूमिका साकारणार आहे. बलराम सिंह मेहता यांनी 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध लढले होते. पिप्पा चित्रपटाची कथा ही गरीबपूर येथे झालेल्या 12 दिवसांच्या युद्धावर आधारित आहेत, या लढाईनंतर बांगलादेशची निर्मिती झाली होती.
पाहा टीझर:
View this post on Instagram
पिप्पा या चित्रपटाबरोबरच 'फोन भूत' हा ईशानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. फोन भूत चित्रपटामध्ये दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे. रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ यांनी या चित्रपटाच्या कथानकाचे लेखन केलं आहे.'फोन भूत' या सिनेमाचे शूटिंग 2020 मध्येच पूर्ण झाले आहे.ईशानसोबतच कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदी हे कलाकार देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
- Shabaash Mithu On Netflix: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण ओटीटीवर हिट; 'शाबास मिथू' यशावर तापसीची पन्नूची प्रतिक्रिया
- Shyamchi Aai : 'श्यामची आई' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला; 'हा' अभिनेता साकारणार साने गुरुजींची भूमिका