Shabaash Mithu On Netflix: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण ओटीटीवर हिट; 'शाबास मिथू' यशावर तापसीची पन्नूची प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी तापसीचा (Taapsee Pannu) 'शाबास मिथू' (Shabaash Mithu) हा चित्रपट रिलीज झाला.
Shabaash Mithu On Netflix : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या बॅक टू बॅक चित्रपट रिलीज होत आहेत. तापसीच्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी तापसीचा 'शाबास मिथू' हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट स्पोर्ट्स बायोपिक आहे. क्रिकेटपटू मिताली राज यांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या 'शाबास मिथू' (Shabaash Mithu) या चित्रपटात तापसीनं प्रमुख भूमिका साकारली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता पण सध्या या चित्रपटानं ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. 'शाबास मिथू' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. सध्या हा चित्रपट भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.
तापसीनं शेअर केली पोस्ट
तापसीनं सोशल मीडियावर 'शाबास मिथू' या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तापसीनं नेटफ्लिक्सचा एक स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. यामध्ये तापसीचा 'शाबास मिथू' हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर दिसत आहे तर आलिया भट्टचा डार्लिंग्स हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर दिसत आहे. तापसीनं हा स्क्रिनशॉर्ट ट्विटरवर शेअर करुन लिहिलं, 'मी सर्वांचे आभार मानते. चित्रपटगृहात नाही पण ओटीटीवर प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला असता तर मला अजून आनंद झाला असता. पण ठिक आहे. केलेले कष्ट नोटिस होत नाहीत, असं होत नाही. तुम्ही आमचा चित्रपट पाहिला, यासाठी मी तुमचे आभार मानते.'
पाहा ट्वीट:
Thank you everyone ! My phone hasn’t stopped buzzing since #ShabaashMithu has released on OTT platform. I am not sure how I feel exactly coz I would’ve liked all of u watch it in theatres but nevertheless I am glad you all saw our little gem 🙏🏽 hardwork never goes unnoticed 🙂 https://t.co/X239VUHilU
— taapsee pannu (@taapsee) August 14, 2022
'शाबास मिथू' हा चित्रपट 15 जुलै 2022 रोजी चित्रपटगृहामध्ये रिलीज झाला. हा चित्रपट क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आधारित आहे. 'शाबास मिथू' चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात तापसी पन्नू व्यतिरिक्त अभिनेते विजय राज, अजित अंधारे आणि अभिनेत्री प्रिया अवोन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
वाचा इतर बातम्या:
- July Upcoming Movies: ‘रॉकेटरी’ ते ‘शाब्बास मिथू’, जुलै महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी!
- Entertainment News Live Updates 15 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!