Dharmaveer : पहिल्याच आठवड्यात 'धर्मवीर'ने केली 13.87 कोटींची कमाई; प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद कायम
Dharmaveer : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
Dharmaveer : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer mukkam post thane) हा सिनेमा आहे. महाराष्ट्रात सध्या 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' या सिनेमाचाच बोलबाला आहे. पहिल्या आठवड्यात 'धर्मवीर' सिनेमाने 13.87 कोटींची कमाई केली आहे. तर आता दुसऱ्या आठवड्यातदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारीदेखील अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला आहे.
प्रेक्षकांच्या प्रतिसादाने सिनेसृष्टीत उत्साहाचं वातावरण
ठाण्यानेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राने 'धर्मवीरांचा जय महाराष्ट्र' प्रेमानं स्वीकारला आहे. हिंदी सिनेमांना गर्दी करणारे प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातं पण 'धर्मवीर' ने बॉक्सऑफिसवरच्या घवघवीत यशाने प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटाकडे येऊ लागल्याचं सुखद चित्र दिसत आहे. अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली आहे.
View this post on Instagram
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख म्हणाले,"मराठी सिनेमासाठी हा अभिमानाचा दिवस आहे. 'धर्मवीर' सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 13.87 कोटींची कमाई केली आहे. आपण नेहमी ऐकतो, मराठी सिनेमांना स्क्रीन्स मिळत नाहीत. पण सिनेमा दर्जेदार असेल तर सिनेमागृहांकडून समोरून विचारणा होते. आम्ही ठरवलं होतं त्यापेक्षा जास्त शोज् सध्या सुरू आहेत. सिनेमा चांगला असेल तर प्रेक्षकसुद्धा तो सिनेमा डोक्यावर घेतात आणि याचं उत्तम उदाहरण 'धर्मवीर' आहे."
प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
10,000 हून अधिक शोज
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाचे 10,000 हून अधिक शोज लागले आहेत. तसेच प्रत्येक शो हाऊसफुल होत आहे. सिनेमातील प्रत्येक कलाकाराचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा सिनेमा सुरू असताना प्रेक्षक सिनेमागृहात टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज करत असतात. तसेच हा सिनेमा पाहताना अनेक शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले.
संबंधित बातम्या