Dharmaveer : 'धर्मवीर' सिनेमात प्रसाद ओक नव्हे 'हा' अभिनेता साकारणार होता आनंद दिघेंची भूमिका
Dharmaveer : बॉक्स ऑफिसवर सध्या 'धर्मवीर' सिनेमा धुमाकूळ घालतो आहे.
Dharmaveer : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer mukkam post thane) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रविण तरडेंनी केले आहे. परंतु 'धर्मवीर' सिनेमासाठी प्रविण तरडेंची पहिली पसंती प्रसाद ओक नव्हती. तर विजू माने (Viju Mane) यांना या भूमिकेसाठी विचारणा झाली होती.
आनंद दिघेंच्या बारीक-सारिक लकबी प्रसाद ओकने आत्मसात केल्या आहेत. 'धर्मवीर' सिनेमात प्रसाद ओक हुबेहुब आनंद दिघे यांच्यासारखाच दिसत आहे. 'धर्मवीर' सिनेमातील प्रत्येक कलाकाराचं, दिग्दर्शकाचं खूप कौतुक होत आहे. त्यामुळेच मराठी सिने रसिकांनी तुम्हाला कधीच माफ नसतं केलं असं म्हणत एक पोस्ट लिहिली आहे.
विजू मानेंनी लिहिले आहे,"प्रवीण म्हणाला, विजू धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका करशील का ? कारण तू त्यांना जवळून पाहिले आहेस. त्यांचा सहवास बराच तुला लाभला आहे. तुला त्यांची प्रत्येक वृत्ती, देहबोली, नजर, लकबी माहिती आहे. मी हसलो. मला वाटलं प्रवीण माझी मस्करी करतोय.प्रवीणला मी म्हणालो, तुला जी हवी ती मदत मी करेन त्यासाठी असं काही बोलायची गरज नाही. तो विषय टाळून आम्ही पुढे गेलो. पण प्रवीणने पुन्हा एकदा प्रमोशनच्या निमित्ताने भेटलो असता विषय काढला अरे विजू तुझी ऑडिशन कधी देतोय? मी म्हटलं कसली ? तर म्हणाला ,धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या रोलची. अरे वेडा आहेस का ???? त्या व्यक्तीचं चरित्र साकारणं? तेवढा बरा अभिनेता मी नाही. आणि जे मला जमणार नाही ते मी कधीच करणार नाही. माझ्या नकाराबद्दल तुला जरी वाईट वाटलं तरी हा निर्णय मी ठाम पणे घेतलेला आहे. तुही असा विचार करू नकोस, खूप चांगले अभिनेते मराठी चित्रपट सृष्टीत आहेत. आणि त्याला प्रसाद ओक दिसला....इतिहास घडला".
प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या