एक्स्प्लोर

Gold Rate : युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळं वाढ होत आहे. युद्ध लांबल्यास सोन्याचे दर 2 लाखांवर पोहोचू शकतात.

पुणे : अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर दिसून आला आहे. सोन्याचे दर युद्धामुळं वाढत असल्याचं पाहायला मिळतं. पुण्यातील  KRA ज्वेलर्सचे भागीदार अतुल अष्टेकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना सोन्याच्या दरांवर भाष्य केलं.27 -28 तारखेपर्यंत सोन्याचे दर 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत होते. शनिवारी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंत सोन्याचे दर 1 लाख 69 हजारांवर पोहोचले होते. काल सोन्याचे दर कमी झाले होते, आज सोन्याचे दर 1 लाख 63 हजारांवर आहेत, असं अष्टेकर यांनी सांगितलं.  

अतुल अष्टेकर म्हणाले की, जागतिक पातळीवर अस्थिरता असल्यानं सोन्याचे दर कमी जास्त होत आहे. हे युद्ध किती दिवस चालतं यावर सोन्याचे दर अवलंबून आहेत. युद्ध आठ दहा दिवसात संपलं तर परिस्थिती नॉर्मल होईल. बरेच तज्ज्ञ म्हणतात युद्ध तीन चार आठवडे लांबलं तर परिणाम तेलावर होईल. तेलाचा पुरवठा कमी झाला तर भविष्यात त्याचा महागाईवर परिणाम होतो. जेव्हा महागाईवर परिणाम होतो, त्यावेळी सोन्याचे भाव वाढलेले दिसतात. महागाई वाढली तर सोन्याचे दर वाढतील, असंही त्यांनी म्हटलं.  

युद्ध लांबलं तर सोन्याचे दर 2 लाखांवर

अमेरिकन डॉलर भक्कम होत आहे, त्या तुलनेत रुपया कमजोर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले नसते आणि डॉलर जर वाढला आणि रुपया कमजोर झाल्यानं भारतात येणाऱ्या सोन्याचा खर्च वाढतो. युद्ध पुढील आठ दहा दिवसात थांबलं तर सोन्याच्या दरात एक, दोन, तीन टक्के, पाच टक्के युद्धाचे दर पाहत होतो तेवढे म्हणजेच 1 लाख 60 हजार रुपये होऊ शकतो. तर, युद्ध लांबलं तर सांगता येणार नाही पण सोन्याचे दर 2 लाखांपर्यंत जाऊ शकतात, असं अतुल अष्टेकर म्हणाले. 

सोन्याचे दर वाढल्यानं ग्राहकांच्या बजेटवर परिणाम होतो. गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत सोन्याचे दर 80 ते 90 हजार रुपयांदरम्यान दर होते. सध्या सोन्याचा दर 1 लाख 60 हजारांच्यावर आहे. भारतीय ग्राहक आहेत त्यांच्या मानसिकतेचा विचार केला तर लग्नामध्ये सोनं खरेदी केले जाते. या वर्षी लग्नाच्या तारखा खूप आहेत. 15 मे पर्यंत लग्नाच्या तारखा खूप आहेत. जूनपासून डिसेंबर पर्यंत लग्नाच्या तारखा आहेत. लग्नाची खरेदी ग्राहकांना करावीच लागेल. यात आव्हान आहे की ग्राहकांच्या बजेटमध्ये दागिने बसणे हे आव्हान असेल. ग्राहकांच्या सोने खरेदीचा कल कमी होणार नाही.  दिवाळीत सोन्याचे दर वाढले तरी ग्राहकांनी खरेदी थांबवलेली नाही, असंही अष्टेकर यांनी म्हटलं. 

सोन्यात गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती?

सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहता तेव्हा ती शेअर मार्केटच्या गुंतवणुकीसारखी नाही, आज घेतलं आणि उद्या विकलं असं नाही. आजपासून 10 वर्षानंतर विचार केला तर तेव्हाचे जे दर असतील तेव्हा विकायला गेला तरी फायदा होईल. शॉर्ट टर्मचा विचार न करता लाँग टर्मचा विचार करावा. सोन्यात गुंतवणूक करायची असेल टप्प्या टप्प्यानं करावी, असंही अष्टेकर म्हणाले.

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
पेट्रोलची चिंता संपणार? लवकरच 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने सुरु होणार, सरकारनं आखली मोठी योजना
पेट्रोलची चिंता संपणार? लवकरच 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने सुरु होणार, सरकारनं आखली मोठी योजना
LPG सिलेंडरसाठीचा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं उचललं पाऊल
LPG सिलेंडरसाठीचा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं उचललं पाऊल
FDI : लवकरच पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढीला मंजुरी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार
लवकरच पेन्शन क्षेत्रात 100 टक्के विदेशी गुंतवणूक, मर्यादा हटवली जाणार,संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Maharashtra Weather Updates मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Devendra Fadnavis and Prajakt Tanpure: देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
Godfather Fame Actor Al Pacino Life Story: 85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?
85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?
Embed widget