एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Happy Birhday Hema Malini : वयाचा अवघ्या 14व्या वर्षी अभिनयाची सुरुवात; मनोरंजन विश्वाची ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळख मिळवणाऱ्या हेमा मालिनी!

Happy Birhday Hema Malini: बॉलिवूड इंडस्ट्रीच्या ‘ड्रीम गर्ल’ (Dream Girl) आणि भाजपच्या लोकसभा खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांचा आज 74वा वाढदिवस आहे.

Happy Birhday Hema Malini: बॉलिवूड इंडस्ट्रीच्या ‘ड्रीम गर्ल’ (Dream Girl) आणि भाजपच्या लोकसभा खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांचा आज 74वा वाढदिवस आहे. हेमा मालिनी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अमुल्य योगदान दिले आहे. बॉलिवूडमध्ये हेमा मालिनी यांची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. रुपेरी पडद्यासोबतच त्या राजकारणी म्हणूनही खूप सक्रिय आहेत.

'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी चित्रपटांमध्ये पदार्पण करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 1961मध्ये आलेल्या तेलुगु चित्रपट 'तपंडव वनवासन'मध्ये हेमा मालिनी यांनी एका नर्तिकेची भूमिका साकारली होती. आजघडीला हेमा मालिनी केवळ हिंदी चित्रपटांच्या अभिनेत्री म्हणूनच नाही तर, एक राजकारणी म्हणून देखील ओळखल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्या राजकारणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.

पहिल्या हिंदी चित्रपटाला मिळाली प्रसिद्धी!

'सपनो का सौदागर' हा हेमा मालिनी यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. हा चित्रपट 1968 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेते राज कपूर झळकले होते. या चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटानंतर हेमा मालिनी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. हेमा मालिनी आपल्या सर्वच चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय करत प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवलं होतं. ‘शोले’ चित्रपटातील ‘बसंती’ या भूमिकेतही हेमा मालिनी यांना प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते. या चित्रपटानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यातील प्रेमकहाणीला सुरुवात झाली. त्यांची ही प्रेमकहाणी चांगलीच गाजली होती.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकथा

हेमा मालिनी यांच्या वडिलांना धर्मेंद्र पसंत नव्हते. त्यांना दोघांचे नाते आवडत नव्हते. जेव्हापासून हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमाच्या चर्चा सुरु झाल्या, तेव्हापासून हेमा जेव्हाही शूटवर असायच्या तेव्हा त्यांच्यासोबत कुटुंबातील काही सदस्य शूटवर उपस्थित असायचे’. हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांचे वडील अनेकदा सेटवर यायचे. यानंतरही धर्मेंद्र यांनी माघार घेतली नाही. अखेर सगळी बंधन झुगारत दोघांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली होती.

हेमा मालिनी यांचा राजकारणात प्रवेश

ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचा चित्रपट ते राजकारणापर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे. अभिनेत्री हेमा मालिनी या सध्या चित्रपटांपासून दूर असून, राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. 2004मध्ये त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये हेमा मालिनी मथुरेच्या लोकसभेवर निवडून आल्या होत्या. हेमा मालिनी यांना कधीच राजकारणात यायचे नव्हते. विनोद खन्ना यांनी हेमा मालिनी यांना राजकारणाचा मार्ग दाखवला. स्वतः हेमा मालिनी यांनी याची कबुली दिली होती.  

हेही वाचा :

Hema Malini: मुंबईमध्ये प्रवास करण्याची हेमा मालिनी यांना का वाटते भिती? गर्भवती महिलांबाबत व्यक्त केली चिंता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget