Hema Malini: मुंबईमध्ये प्रवास करण्याची हेमा मालिनी यांना का वाटते भिती? गर्भवती महिलांबाबत व्यक्त केली चिंता
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी (Hema Malini) यांनी मुंबईमधील रस्त्यांवरी खड्ड्यांवर भाष्य केलं.
Hema Malini : बॉलिवूडमधील ‘ड्रीम गर्ल’अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) या त्यांच्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. हेमा मालिनी या विविध विषयांवर त्यांची मत मांडत असतात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी मुंबईमधील रस्त्यांवरी खड्ड्यांवर भाष्य केलं. मुंबई शहर आधी असं नव्हते, मुंबईच्या रस्त्यांमुळे घराबाहेर पडायला भिती वाटते, असं हेमा मालिनी यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं.
प्रेग्नंट महिलांबाबत व्यक्त केली चिंता
पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना समस्या जाणवतात. पावसानंतर रस्त्यांवरील खड्डे पाण्याने भरतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढते. या गोष्टीबाबत हेमा मालिनी यांनी चिंता व्यक्त केली आहे. मुंबईचे ट्रॅफिक आणि रस्ते यांवर हेमा मालिनी यांनी मत व्यक्त केलं. मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, 'खड्डे असलेल्या या रस्त्यावर गर्भवती महिला या कसा प्रवास करतात, याची मी कल्पना देखील करु शकत नाही. मला मुंबईकरांबाबत चिंता वाटते. रस्त्यांवर ट्रॅफिक होऊ देऊ नये, हे पोलिसांचे काम आहे. पण मला मीरा रोडपासून जुहू येथे जाण्यासाठी दोन तास लागले. ज्यामुळे मला त्रास झाला.'
घराबाहेर पडण्याची भिती वाटते: हेमा मालिनी
मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी सांगितलं की त्यांना घराबाहेर पडण्याची भिती वाटते. त्या म्हणाल्या, 'मला घराबाहेर जाण्याची भिती वाटते. कारण रस्त्यांवर खूप ट्रॅफिक आहे. दिल्ली आणि मथुरा येथे देखील खूप ट्रॅफिक होते, पण आता तिथल्या गोष्टी सुधारल्या आहेत. शूटिंगसाठी आम्ही मुंबईच्या रस्त्यांवर खूप प्रवास केला आहे, पण आता ते खूप अवघड होत आहे. मुंबई शहर काय होते आणि आता काय झाले आहे.'
बागबान, मोहिनी, सपनों का सौदागर, शोले या चित्रपटातील हेमा मालिनी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शोले चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या बसंती या भूमिकेमुळे हेमा मालिनी यांनी विशेष लोकप्रियता मिळाली.
हेही वाचा: