Genelia Deshmukh: ऑनस्क्रीन किसिंग सीनबाबत जिनिलिया देशमुखनं मांडलं मत; म्हणाली, 'मी तसा सीन करताना...'
एका मुलाखतीमध्ये जिनिलियाला (Genelia Deshmukh) ऑनस्क्रीन किसिंग सीनबाबत विचारण्यात आलं. यावेळी जिनिलियानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Genelia Deshmukh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) ट्रायल पीरियड (Trial period) हा चित्रपट 21 जुलै रोजी रिलीज होणार आहे. जिनिलिया सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. एका मुलाखतीमध्ये जिनिलियाला ऑनस्क्रीन किसिंग सीनबाबत विचारण्यात आलं. यावेळी जिनिलियानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
किसिंग सीनबाबत काय म्हणाली जिनिलिया?
ऑन स्क्रिन किसिंग सीनबाबत जिनिलियानं (Genelia Deshmukh) एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मला वाटतं की, ऑनस्क्रीन किसिंग सीन शूट करताना मला कम्फर्टेबल वाटणार नाही. त्यामुळे मी तसा सीन करताना चांगली दिसणार नाही. मी स्क्रिनवर खोटा अभिनय करु शकत नाही. जर तुम्हाला काही करायचं असेल तर ते तुम्ही मनापासून केलं पाहिजे, असं मला वाटतं. Sensuality ही फक्त किसिंग सीनपूर्ती मर्यादित असते, असं मला वाटत नाही.'
लग्नानंतर बऱ्याच काळ जिनिलिया ही चित्रपटसृष्टीमध्ये काम करत नव्हती. एका मुलाखतीमध्ये याबाबत जिनिलियाला विचारण्यात आलं. पती रितेश देशमुखमुळे तिनं कामामधून ब्रेक घेतला होता का? असा प्रश्न जेव्हा जिनिलियाला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला, तेव्हा जिनिलिया उत्तर देत म्हणाली, 'लोक जे म्हणायचे आहे ते म्हणतात पण सत्य हे आहे की, कामामधून ब्रेक घेण्याचा निर्णय हा माझा होता. जसे लोक म्हणतात तू जास्त काम का करत नाहीस?' तर याबद्दल मी तुम्हाला सांगते की, मला वाटत नाही की मी जितके काम करू शकेन तितके करते. मी माझ्या मुलांना जास्त वेळ देते.'
View this post on Instagram
जिनिलियाचा ट्रायल पीरियड ओटीटीवर होणार रिलीज
ट्रायल पीरियड हा चित्रपट 21 जुलै रोजी जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अलेया सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.जिनिलिया देशमुख आणि मानव कौल यांच्यासोबतच शक्ति कपूर, शीबा चड्ढा, गजराज राव हे कलाकार देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. प्रेक्षक जिनिलिया देशमुखच्या या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:






















