Action Packed Thrillers : अॅक्शन, थ्रिलर आणि सस्पेन्सचा तडका; पाहा हे चित्रपट आणि वेब सीरिज
नेटफ्लिक्स (Netflix) ,सोनी लिव्ह (Sony Liv), हॉटस्टार (Hotstar) या ओटीटी प्लॅटफोर्मवर तुम्ही घरबसल्या चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता.
Action Packed Thrillers : सध्या प्रेक्षकांना सस्पेंस, थ्रिलर आणि अॅक्शन असणारे चित्रपट आणि वेब सीरिज आवडतात. ओटीटीवरील वेब सीरिज आणि चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. नेटफ्लिक्स (Netflix) ,सोनी लिव्ह (Sony Liv), हॉटस्टार (Hotstar) या ओटीटी प्लॅटफोर्मवर तुम्ही घरबसल्या चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता. ओटीटीवरील या वेब सीरिज आणि हे चित्रपट तुमचे मनोरंजन करतील. वीकेंडला हे चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही पाहू शकता.
स्पेशल ऑप्स
डिज्नी प्लस हॉटस्टारवरील स्पेशल ऑप्स 1 ही सुपरहिट वेब सीरीज तुम्ही पाहू शकता. या सीरिजमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी काम केलं आहे. या सीरिजमधील केके मेननच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली.
टायगर जिंदा है
बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या टायगर जिंदा है या चित्रपटानं अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटातील सलमानचा स्वॅग आणि कतरिना कैफच्या ग्लॅमरस अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले होते. हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झाला होता. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीनं बघतात. 'टायगर जिंदा है' हा सलमानच्या 'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'एक था टायगर' या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.
जॉन विक
हॉलिवूडचा सुपरस्टार कियानो रीव्सचा प्रसिद्ध चित्रपट जॉन विक हा अॅक्शन पॅक चित्रपटांपैकी एक आहे. रिपोर्टनुसार, जॉन विकचा चौथा भाग पुढील वर्षी रिलीज होऊ शकतो.
धाकड
अभिनेत्री कंगना रनौतच्या धाकड या चित्रपटामध्ये देखील अॅक्शन, ड्रामा आणि थ्रिल आहे. हा चित्रपट तुम्ही झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केलं आहे. या सिनेमात कंगना रनौत, अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने कंगनाने ‘रॉ एजंट’ची भूमिका साकारली आहे.
मास्टर
साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचा मास्टर हा चित्रपट तुमचे मनोरंजन करेल. तुम्हाला OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर मास्टर पाहायला मिळेल. या चित्रपटात थलपथी आणि अभिनेता विजय सेतुपती यांच्यात धमाकेदार अॅक्शन आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: