Chabuk : मिलिंद शिंदे-सुधीर गाडगीळ यांचा 'चाबुक' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Chabuk : 25 फेब्रुवारीला 'चाबुक' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Chabuk : 'चाबुक' सिनेमा 25 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कल्पेश भांडारकरने केले आहे. चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikari) व अभिनेत्री स्मिता शेवाळे (Smita Shewale) मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत सुधीर गाडगीळ आणि मिलिंद शिंदे यांच्यासुद्धा प्रमुख भूमिका आहेत.
अभिनेता मिलिंद शिंदे यांनी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटांपासून ते लघुपटांपर्यंत असंख्य कलाकृतींमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. सूत्रसंचलनाच्या दुनियेत आपला भरीव ठसा उमटवणारे सुधीर गाडगीळ मात्र 'चाबुक' च्या निमित्ताने प्रथमच चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहेत. 'चाबुक' मध्ये मिलिंद शिंदे आणि सुधीर गाडगीळ यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमध्ये गुरु-शिष्याचं नातं पहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
अभय इनामदार आणि निरंजन पटवर्धन यांनी लिहिलेल्या कथेवर 'चाबुक' वाटावी अशी 'चाबुक'ची पटकथा दिग्दर्शक कल्पेश भांडारकर यांनीच लिहिली आहे. ‘चाबुक’ चित्रपटाची कथा अभय इनामदार आणि निरंजन पटवर्धन यांची आहे. गीते मंदार चोळकर आणि मिलिंद शिंदे यांनी लिहिली असून संगीत विपीन पटवा यांचे आहे. चित्रपटातील सुमधुर गीतांना बेला शेंडे, ब्रिजेश शांडिल्य, विपिन पटवा यांचा स्वरसाज लाभला आहे.
संबंधित बातम्या
Love Hostel Trailer : शाहरुख खान निर्मित 'लव हॉस्टल' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, बॉबी देओल, सान्या मल्होत्रासह विक्रांत मेस्सी सारखी तगडी स्टारकास्ट
Amruta Fadnavis : 'व्हॅलेंटाईन डे'ला अमृता फडणवीसांचा नवा 'अवतार'; फोटो शेअर करत केली नव्या गाण्याची घोषणा
Kangana Ranaut Update: ‘अशा पालकांवर कारवाई करावी...’, ‘गंगूबाई काठियावाडी’चे डायलॉग बोलणाऱ्या चिमुकलीवर संतापली कंगना रनौत!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha