Kangana Ranaut Update: ‘अशा पालकांवर कारवाई करावी...’, ‘गंगूबाई काठियावाडी’चे डायलॉग बोलणाऱ्या चिमुकलीवर संतापली कंगना रनौत!
Kangana Ranaut on Alia Bhatt: कंगना रनौतने दीपिका पदुकोणच्या ‘Gehraiyaan’ या चित्रपटानंतर आता आलिया भट्टवर निशाणा साधला आहे.
![Kangana Ranaut Update: ‘अशा पालकांवर कारवाई करावी...’, ‘गंगूबाई काठियावाडी’चे डायलॉग बोलणाऱ्या चिमुकलीवर संतापली कंगना रनौत! Kangana Ranaut slams viral video of little girl imitating Alia Bhatt's character from 'Gangubai Kathiawadi' Kangana Ranaut Update: ‘अशा पालकांवर कारवाई करावी...’, ‘गंगूबाई काठियावाडी’चे डायलॉग बोलणाऱ्या चिमुकलीवर संतापली कंगना रनौत!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/a71999f8d17c60ca4e24240d12179080_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kangana Ranaut Update: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्याच्यावर अनेक रील्स तयार होत आहेत. सोशल मीडियावर चाहते आपापल्या पद्धतीने आलियाची कॉपी करत आहेत. यादरम्यान आलियाच्या एका छोट्या चाहतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती गंगूबाईच्या पात्राची नक्कल करताना दिसत आहे. यावरून आता कंगना रनौतने (Kangana Ranaut) आलियावर निशाणा साधला आहे.
कंगना रनौतने तिच्या इन्स्टा स्टोरीवर या मुलीचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'या मुलीने तोंडात बीडी घेऊन अश्लील संवाद बोलत सेक्स वर्करची नक्कल करावी का? बघा या मुलीची देहबोली? या वयात लैंगिकता दाखवणे योग्य आहे का? आणखी शेकडो मुले आहेत, जे अशीच कृती करत आहेट. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 60च्या दशकातील कामाठीपुरा येथील प्रसिद्ध सेक्स वर्कर गंगूबाईच्या जीवनावर आधारित आहे.’
सरकारने कठोर कारवाई करावी!
‘या सर्व पालकांवर सरकारने कठोर कारवाई करावी, जे अल्पवयीन मुलांकडून पैसे कमवण्यासाठी सेक्स वर्कर आणि दलाल यांच्या बायोपिकची जाहिरात करत आहेत. यासोबतच त्यांनी महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना टॅग करत यात हस्तक्षेप करावा’, असे लिहिले आहे. त्याचबरोबर कंगना रनौतने या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, जी तिने आता डिलीट केली आहे.
पाहा कंगनाची स्टोरी :
कंगना रनौतने आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोणवर अनेकदा निशाणा साधला आहे. दीपिकाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘Gehraiyaan’ या चित्रपटाची खिल्ली उडवत कंगनाने लिहिले होते की, चित्रपटाच्या नावावर कचरा देऊ नका.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, सध्या कंगना रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ होस्ट करताना दिसणार आहे. कंगनाचा हा शो Alt Balaji आणि MX Player वर प्रसारित होणार आहे. कंगनाचा हा शो बिग बॉसच्या संकल्पनेवर आधारित असेल.
हेही वाचा :
- Viral Video : 'अरे ही तर छोटी आलिया...' ; व्हिडीओ पाहिलात का?
- Glimpse of Radhe Shyam : प्रभासचं प्रेक्षकांना ‘व्हॅलेंटाईन डे’ सरप्राईज, ‘राधे श्याम’चे नवे पोस्टर रिलीज
- Doctor Strange Trailer : ‘डॉक्टर स्ट्रेंज’मध्ये ‘आयर्न मॅन’ परतला! आता ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)