एक्स्प्लोर

डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम

सांगलीतील रेकॉर्डमध्ये आधी 7 हजार 338 महिलांनी एकत्र येऊन तो रेकॉर्ड रचला होता. मात्र, तो रविवारी डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले

ठाणे: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह (Dombivali) कल्याण तालुक्यातील 9 हजार 111 महिला आणि विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra chavan) यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझीम वादन स्पर्धेत रविवारी येथील श्री संत सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या विद्यार्थीनी आणि महिला भगिनी आदींनी एकत्र येत 9,111 एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. या आधी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता, अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी सांगितले.

सांगलीतील रेकॉर्डमध्ये आधी 7 हजार 338 महिलांनी एकत्र येऊन तो रेकॉर्ड रचला होता. मात्र, तो रविवारी डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. साडेपाच मिनिटांची विविध प्रात्यक्षिक सादर करून महिलांनी हा रेकॉर्ड केला. त्यावेळी स्वप्नील डांगरेकर यांनी आमदार रविंद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी रविंद्र चव्हाण यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे सर्टिफिकेट व मेडल हस्तांतरीत केले. त्यावेळी रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानत लेझीम ही आपली संस्कृती असून ती टिकवणे हे आपले काम आहे, असे म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षी शारीरिक व्यायामावर भर देऊन जगासमोर सशक्त भारत कसा असू शकतो हे दाखवून देण्याचा संकल्प सोडला होता, त्या निमित्ताने महिला आणि विद्यार्थीनी आदींनी एकत्र येऊन हा अनोखा रेकॉर्ड केला याचा मला डोंबिवलीकर म्हणून प्रचंड आनंद आहे, हा रेकॉर्ड मी भारत मातेच्या चरणी समर्पित करतो असेही उद्गार त्यांनी यावेळी काढले. कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीचे त्यांनी आभार मानले. शिक्षक, विद्यार्थी आदींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, डोंबवलीतील सारा आसमंत भारत माता की जय, जय श्रीराम, वंदे मातरमने दणाणून सोडला होता. प्रत्येकाच्या चेहऱयावर वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. लेझीमचा झुंकार सर्वत्र निनादत होता, ढोल ताशांच्या गजरात त्या रेकॉर्डचे हजारो डोंबिवलीकरांनी स्वागत केले, आणि प्रत्येकाच्या सहभागाबद्दल कौतुक करण्यात आले. अशा दैदिप्यमान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पहाटेपासून डोंबिवलीकर प्रतीक्षेत होता, अखेर वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा होताच प्रचंड जल्लोषात त्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा

मनसेच्या वर्धापन दिनासाठी आखली विशेष योजना; राज ठाकरेंनी शेअर केली पोस्ट, म्हणाले, 'रायगडावर महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार! सासरच्या मंडळींकडून महिलेला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद
नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार! सासरच्या मंडळींकडून महिलेला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद
Vidhanparishad Election 2026 Shivsena: मोठी बातमी: विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला, दुसऱ्या जागेवर धक्कातंत्राचा वापर करणार? ही 6 नावं रेसमध्ये
विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला, दुसऱ्या जागेवर धक्कातंत्राचा वापर करणार? ही 6 नावं रेसमध्ये
Sahar Shaikh Mumbra AIMIM: करारा जवाब मिलेगा! 'नॉट रिचेबल' सहर शेख यांचे वडील मुंब्रा पोलिसांत हजर, म्हणाले, 'दोन दिवसात...'
करारा जवाब मिलेगा! 'नॉट रिचेबल' सहर शेख यांचे वडील मुंब्रा पोलिसांत हजर, म्हणाले, 'दोन दिवसात...'
Sahar Shaikh Mumbra AIMIM: नगरसेवकपद धोक्यात, मग नॉट रिचेबल...सहर शेख वानखेडेवर, स्टोरी पोस्ट करत म्हणाल्या, गेम ओव्हर!
नगरसेवकपद धोक्यात, मग नॉट रिचेबल...सहर शेख वानखेडेवर, स्टोरी पोस्ट करत म्हणाल्या, गेम ओव्हर!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget