एक्स्प्लोर
Advertisement
'दंगल'च्या शूटदरम्यान मी मेलो तर रणबीरला घ्या : आमीर
मुंबई : दंगल चित्रपटात कुस्तीगीर महादेव फोगट यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खान चांगलीच मेहनत करत आहे. चित्रीकरणादरम्यान आपल्या जीवाचं काही बरं-वाईट झालं तर आपल्या भूमिकेसाठी एखादा चांगला कलाकार शोधा, असा सल्ला आमीरने दिग्दर्शक नितेश तिवारींना दिला होता.
रणबीर कपूर, रणवीर सिंग, वरुण धवन, शाहिद कपूर यांच्यापैकी एखाद्या अभिनेत्याला तरुण महावीर फोगट यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी घ्या, असं आमीरने सांगितल्याचं दिग्दर्शकाने सांगितलं आहे.
'आयुष्यात काहीही होऊ शकतं. उद्या काय होईल हे आज सांगू शकत नाही. पाच महिन्यांच्या चित्रीकरणाच्या काळात माझा मृत्यू झाला, तरी शूटिंग सुरु ठेवायचं. महावीर यांच्या तरुणपणाची भूमिका साकारण्यासाठी रणबीर, रणवीर, वरुण किंवा शाहिद.. यापैकी कोणाचीही निवड कर.' असं आमीर म्हणाला.
मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आमीर चित्रपटात इतका गढला होता, की तो छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टीबाबत काळजी करायचा. अगदी मरणही त्याला डोळ्यासमोर दिसलं असावं, असं म्हटलं जातंय.
'मी मेलो तर? अख्खा सिनेमा माझ्यावर अवलंबून असल्याने मी जखमी झालो तर? अशा शंकाकुशंका वारंवार माझ्या मनात यायच्या. त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग अखेरच्या टप्प्यात असताना माझा मृत्यू झाला, तर मला अशा-अशा गोष्टी व्हायला हव्यात, हे मी लिहून ठेवलं होतं.' असंही आमीरने सांगितलं.
आमीर खानने दंगल चित्रपटात तरुण आणि वृद्ध महावीर फोगट यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यासाठी त्याने वजन कमालीचं वाढवण्याची आणि कमी करण्याची मेहनतही घेतली होती. येत्या नाताळच्या मुहूर्तावर दंगल प्रदर्शित होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
ट्रेडिंग न्यूज
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement