Cannes Film Festival : कौतुकास्पद! अनुराग कश्यपच्या 'कॅनेडी'ला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालं 'स्टँडिंग ओव्हेशन'
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival 2023) दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) 'कॅनेडी (Kennedy)' चित्रपटाचा प्रीमियर पार पडला आहे.
Cannes Film Festival : जगभरातील सिनेप्रेमींसाठी महत्त्वाचा असणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' ची सुरुवात (Cannes Film Festival 2023) 16 मे पासून झाली आहे. 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी वॉक केला. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) 'कॅनेडी (Kennedy)' चित्रपटाचा प्रीमियर पार पडला आहे. अनुरागच्या या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'स्टँडिंग ओव्हेशन' मिळालं आहे. ही भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनुरागचा कॅनेडी हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून 7 मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले.
अनुरागनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'कान्समध्ये तुमचा चित्रपट दाखवणे नेहमीच खास असते. हा आयुष्यातील संस्मरणीय क्षण आहे. 'केनेडी' हा माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे. प्रेक्षकांच्या 7 मिनिटांच्या टाळ्यांच्या कडकडाटासाठी मी कृतज्ञ आहे. '
View this post on Instagram
कॅनेडी चित्रपटामध्ये अभिनेत्री सनी लिओनी आणि राहुल भट यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. अनुराग, सनी आणि राहुल या तिघांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक केला. सनीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ' माझ्या करिअरमधील आतापर्यंतचा अभिमानास्पद क्षण! या क्षणासाठी मी अनुरागचे आभार मानते! राहुल तुझेही आभार'
View this post on Instagram
याआधी आर. माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळाले होते.
अनुरागच्या चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती
अनुरागचे चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकतात. त्याच्या 'रमन राघव 2.0 (Raman Raghav 2.0)', 'अग्ली (Ugly)' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर (Gangs of Wasseypur) या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :