Bhirkit : 'भिरकीट' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित; गिरिश कुलकर्णी आव्हानात्मक भूमिकेत
Bhirkit : 'भिरकीट' हा सिनेमा 17 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Bhirkit : 'भिरकीट' (Bhirkit) हा चित्रपट 17 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. 'भिरकीट'ची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे असून हा एक जबरदस्त विनोदी चित्रपट आहे. पोस्टरमध्ये सगळेच विनोदवीर एकत्र दिसत असून हा चित्रपट धमाका उडवणार हे नक्की. सध्यातरी चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे, याचा अंदाज येत नसला तरी 'भिरकीट' प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणार आहे.
अनुप जगदाळे यांची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सैराट फेम तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जबरदस्त कलाकारांची फळी असलेला हा चित्रपट येत्या 17 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
View this post on Instagram
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणाले,"या चित्रपटाची जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हाच अनेकांनी 'भिरकीट' म्हणजे नक्की काय? असे विचारले होते. प्रेक्षकांच्या मनातही प्रश्न आहे नक्की काय विषय आहे हा? तर हळूहळू 'भिरकीट' म्हणजे काय हे प्रेक्षकांना कळू लागेल. सध्या एकाच सांगू शकेन हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटात इतके दमदार कलाकार आहेत. सगळेच विनोदाचे बादशाह आहेत. त्यामुळे तुफान धमाल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.''
संबंधित बातम्या