एक्स्प्लोर

Arjun Kapoor : डिप्रशेन, वाढतं वजन ते अभिनयातून ब्रेक; अर्जुन कपूरने स्वत:च्या प्रकृतीविषयी केला धक्कादायक खुलासा,झालाय 'हा' गंभीर आजार

Arjun Kapoor On His Depression: अर्जुन कपूर सध्या डिप्रेशनमुळे एका गंभीर आजारासोबत झुंजत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

Arjun Kapoor On His Depression: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिंघम अगेन या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगण (Ajay Devgan), अक्षय कुमार (Akshay Kumar), रणवीर सिंग (Ranveer Singh), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) अशी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात अर्जुनने खलनायकाची भूमिका साकारली आहे. पण आता अर्जुन त्याच्या वैयक्तिक आजारामुळेही चर्चेत आलाय. कारण अर्जुनने नुकतच त्याच्या प्रकृतीविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. 

अर्जुनने तो सध्या डिप्रेशनमध्ये असून हाशिमोटो नावाच्या आजाराशी झुंज देत असल्याचं सांगितलं आहे. अनुपम चोप्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्जुनने हा खुलासा केला आहे. त्यामुळे तो सध्या या आजारावर उपचारही घेत असल्याची माहिती अर्जुनने दिली आहे.                                      

अर्जुन कपूरने काय म्हटलं?

अर्जुनने त्याच्या फ्लॉप सिनेमांविषयी बोलताना म्हटलं की, मी थेरपी घ्यायला सुरुवात केली होती. डिप्रेशन आणि त्यावर थेरपीची प्रक्रिया मागच्या वर्षापासून सुरु झाली आहे. मला नाही माहित नाही मी डिप्रेशनमध्ये आहे की नाही. पण मला हे माहितेय की मी काहीही काम करत नाहीये. माझं आयुष्य फिल्मी झालं होतं आणि आता अचानक मला इतर लोकांचं काम पाहण्याची सवय झाली आहे आणि मनात विचार आहे की, मी ते करू शकेन का, मला ती संधी मिळेल का?

अर्जुन कपूरला करावा लागला डीप्रेशनचा सामना

अर्जुन कपूर पुढे म्हणाला की, मी कधीही कडवट किंवा नकारात्मक व्यक्ती नव्हतो, पण हे माझ्या आत खूप वाईट रीतीने पुढे सरकतंय.मी थेरपी सुरू केली आणि काही थेरपिस्टकडे गेलो, ज्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे मी पुन्हा गोंधळलो. त्यावेळी मला डिप्रेशनचं निदान झालं. मी याबद्दल नेहमी उघडपणे बोलत नाही, परंतु मला हाशिमोटो रोग देखील आहे, जो थायरॉईडचाच एक भाग आहे.  आता सध्या माझी स्थिती ही एकतर फ्लाईट मोड किंवा फाईट मोड अशी आहे. मला हा आजार मी 30 वर्षांचा असताना झाला आहे. 

ही बातमी वाचा : 

Marathi Serial : 'शेवटचे काही दिवस...', कलर्स मराठीची आणखी एक मालिका घेणार काहीच महिन्यांत निरोप? बिग बॉस फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Sunita Divorce: गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Embed widget