Kangana Ranaut : कंगना रणौतला दिलासा देण्यास दंडाधिकारी न्यायालयानं दिला नकार
Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला दिलासा देण्यास दंडाधिकारी न्यायालयानं नकार दिला आहे.
Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) दिलासा देण्यास दंडाधिकारी न्यायालयानं नकार दिला आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यातील सुनवणीस कंगनाला कायम गैरहजर राहण्याची सूट देण्यास मुंबईतील अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयानं नकार दिला आहे. केवळ विशेष परिस्थितीतच गैरहजर राहण्यास न्यायालयाकडून परवानगी देण्यात येईल, असं न्यायालयानं मंगळवारी जारी केलेल्या आपल्या संक्षिप्त आदेशात स्पष्ट करत सुनावणी 7 एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं जावेद अख्तर यांच्याविरोधात काही विधानं केली होती. त्यास कंगनाची बहिण रंगोली चंदेलनंही दुजोरा देत समाजमाध्यमांवर याबाबत कंगनाच्या समर्थनार्थ काही पोस्ट टाकल्या होत्या. मात्र, या प्रकरणात काहीही तथ्य नसून यातनं आपली नाहक बदनामी होत आहे, असा दावा करत कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारत फौजदारी मानहानीचा खटला दाखल आहे.
मार्च 2021 पासून सुरू असलेल्या या खटल्यादरम्यान यापुढे सतत गैरहजर राहण्यासाठी कंगनानं कोणत्या या ना त्या कारणासाठी सूट मागितलीच आहे. न्यायालयाने वॉरंट बजावल्यानंतर अखेर 20 सप्टेंबर 2021 रोजी कंगना अंधेरी न्यायालयात हजर झाली होती. त्यानंतर आता कंगनानं अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीस हजर राहण्यापासून कायमची सूट देण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केली होता जो कोर्टानं फेटाळून लावला आहे. मात्र केवळ विशेष परिस्थितीतच गैरहजर राहण्यास न्यायालयाकडून परवानगी देण्यात येईल, असं न्यायालयाकजनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Godavari : कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर 'गोदावरी' आता न्यूयॅार्कमध्ये झळकणार!
Oscars 2022 Live Streaming : सिनेप्रेमींना 94 वा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या..
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha