(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
'द कश्मीर फाइल्स' लवकरच येणार ओटीटीवर
गेली काही दिवस 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. प्रेक्षक या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहेत. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर रिलीज होणार आहे. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे प्रोडक्शन झी स्टूडिओनं केलं आहे. त्यामुळे रिपोर्टनुसार, झी- 5 या ओटीटी प्लॅटफोर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.
एकीकडे ‘शिवराज अष्टक’, तर दुसरीकडे ‘शिवप्रताप’
‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’नंतर प्रेक्षक आता ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि ‘शेर शिवराज’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. यातचा आता आणखी एका नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या ‘शिवप्रताप’ या चित्रपट मालिकेतील पहिला चित्रपट ‘वाघनखं’ लवकरच रिलीज करण्याची घोषणा केली आहे.
94 वा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल?
सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 27 मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा पार पडणार आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा होणार आहे. तर 28 मार्चला भारतात या पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर स्टारर 'द कश्मीर फाइल्स’ची बॉक्स कमाई अजूनही जोरदार सुरु आहे. या चित्रपटाची कमाई दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. व्यापार तज्ज्ञांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर घोषित केले आहे. पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत चित्रपटाच्या कमाईत कोणतीही घट झालेली नाही. मात्र, 11व्या दिवशी आकड्यांमध्ये 50 टक्क्यांची घसरण झाली. असे असले तरी दुसऱ्या सोमवारी या चित्रपटाने 12 कोटींचे जबरदस्त कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने 11 दिवसांत एकूण 179 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.
'गली बॉय' रॅपर MC Tod Fod चे वयाच्या 24 व्या वर्षी निधन
रॅपर धर्मेश परमार उर्फ एमसी तोड फोडचे निधन झाले आहे. त्यानं वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता रणवीर सिंह आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून धर्मेशला श्रद्धांजली वाहिली आहे.
संबंधित बातम्या
Beast Release Date : विजय थलापतीचा 'बीस्ट' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Vishu : आगळीवेगळी प्रेमकहाणी असलेल्या 'विशू'चा ट्रेलर प्रदर्शित
Godavari : कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर 'गोदावरी' आता न्यूयॅार्कमध्ये झळकणार!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha