Ms Dhoni : अजय देवगनसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार महेंद्र सिंह धोनी? जाणून घ्या सत्य
Ajay Devgn Ms Dhoni : अजय देवगन आणि महेंद्र सिंह धोनी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ajay Devgn Ms Dhoni : बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगन (Ajay Devgn) नेहमीच त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. 'दृश्यम 2' या सिनेमानंतर अजय देवगन आणि तब्बूची जोडी 'औरों में कहां दम था' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नीरज पांडेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान अजयचा महेंद्र सिंह धोनीसोबतचा (MS Dhoni) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अजय देवगन आणि महेंद्र सिंह धोनी यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर ते दोघे एकत्र सिनेमात काम करत असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. पण अजय आणि धोनी कोणताही सिनेमा करत नाही आहेत. अजय आणि महेंद्रच्या फोटोमध्ये दोघेही छान पोझ देताना दिसत आहेत.
अजय-धोनीच्या व्हायरल फोटोमागचं सत्य जाणून घ्या... (Ajay Devgn Ms Dhoni Viral Photo)
अजय आणि महेंद्र सिंहचा व्हायरल होणारा फोटो 2020 मधला आहे. अजयने हा फोटो शेअर करत लिहिलं आहे,"क्रिकेट आणि सिनेमे...आपला देश जोडणारा धर्म आहेत". अजय त्यावेळी 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा सिनेमा प्रमोट करत होता. या सिनेमात अजयने तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. तर काजोलने त्यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारली होती.
Cricket and Films ... the uniting religion of our country @msdhoni pic.twitter.com/yMlEBKZk63
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 9, 2020
अजय देवगनच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Ajay Devgn Upcoming Project)
अजय देवगनचा 'औरों में कहां दम था' हा रोमँटिक ड्रामा असणारा सिनेमा आहे. 26 एप्रिल 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'औरें मे कहां दम था' हा सिनेमा हिंदीसह आणखी भाषांमध्येही रिलीज होणार आहे. या सिनेमात जिमी शेरगिलदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या सिनेमातही अजय देवगन झळकणार आहे. बाजीरावच्या भूमिकेत अजय देवगन दिसेल. 'सिंघम 3' या सिनेमात अजय देवगनसह टायगर श्रॉफ, करीना कपूर, अक्षय कुमार हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अजयचा 'सिंघम अगेन' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'सिंघम 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित शेट्टीने सांभाळली आहे.
संबंधित बातम्या