Adipurush: ओम राऊतनं दिलं चाहत्यांना गिफ्ट; आदिपुरुषचं नवं पोस्टर रिलीज
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) वाढदिवसाचं औचित्य साधत ओम राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दमदार संदेश देत चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे.
![Adipurush: ओम राऊतनं दिलं चाहत्यांना गिफ्ट; आदिपुरुषचं नवं पोस्टर रिलीज Adipurush Prabhas movie poster share by Om Raut Adipurush: ओम राऊतनं दिलं चाहत्यांना गिफ्ट; आदिपुरुषचं नवं पोस्टर रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/23/541361322b652e39e812d0062748c9d31666500489287259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Adipurush: दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'चे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक, ओम राऊत भव्य चित्रपट 'आदिपुरुष'साठी दिवसरात्र एक करुन प्रचंड मेहनत घेत आहेत.
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) वाढदिवसाचं औचित्य साधत ओम राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दमदार संदेश देत चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करत ओम राऊत यांनी लिहिले, "मिळवूनी वानरसेना राजा राम प्रगटला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम. 🙏'' या पोस्टरमध्ये प्रभासनं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामांच्या भूमिकेत दिसत आहे.
प्रभासबाबत बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले, ''प्रभास हा आपल्या भूमिकेसाठी अत्यंत मेहनत घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. हे पोस्टर त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे.''
ओम राऊत यांचा पहिला मराठी सिनेमा ‘लोकमान्य एक युगपुरुष’ हा रूपेरी पडद्यावर गाजला. पहिल्यावहिल्या सिनेमातल्या दिग्दर्शनानं ओम राऊत यांनी साऱ्यांची मनं जिंकली. त्यानंतर त्यांच्या 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमान असलेल्या ओम राऊत यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र ताकदीनं उभा आहे.
View this post on Instagram
आदिपुरुष हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन ही सीता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)