Vikrant Massey : व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी विक्रांत मेस्सीचा शीतल ठाकूरसोबत विवाह
Vikrant Massey : मिर्झापूर वेब सिरीजचा अभिनेता विक्रांत मेस्सीचा याने गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत आज लग्न केले. डिसेंबर 2019 मध्ये या दोघांची एंगेजमेंट झाली होती.
![Vikrant Massey : व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी विक्रांत मेस्सीचा शीतल ठाकूरसोबत विवाह actor vikrant massey and sheetal thakur register their marriage Vikrant Massey : व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी विक्रांत मेस्सीचा शीतल ठाकूरसोबत विवाह](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/53bfdde5a68cea77f14630d67045b20e_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vikrant Massey : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये अनेकांचे विवाह होत आहेत. यामध्ये अभिनेता विकी कौशल-कतरिना कैफ, अंकिता लोखंडे-विकी जैन, मौनी रॉय आणि सूरज यांचा समावेश आहे. आता बॉलिवूडचे आणखी एक जोडपे विवाह बंधनात अडकले आहे. मिर्झापूर वेब सिरीजचा अभिनेता विक्रांत मेस्सीचा याने गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत आज लग्न केले.
विक्रांत मेस्सीचा आणि शीतल यांनी वर्सोव्यातील त्यांच्या घरीच विवाह केला आहे. यावेळी विक्रांत आणि शीतलच्या कुटुंबाव्यतिरिक्त जवळचे काही मित्र उपस्थित होते. दोघांनी काही दिवसांपूर्वीच लग्नाची तारीख ठरवली होती. लग्नानंतर दोन्ही कुटुंब खूप आनंदी आहेत.
विक्रांतने नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने आपल्या व्हॅलेंटाईन प्लॅनबद्दल बोलताना शीतलबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. विक्रांत मॅसी आणि शीतल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. डिसेंबर 2019 मध्ये या दोघांची एंगेजमेंट झाली होती. त्यानंतर आज हे जोडपे विवाह बंधनात अडकले.
दरम्यान, विक्रांत मेस्सीच्या 'लव्ह हॉस्टेल' या चित्रपटाचा ट्रेलर आजच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये विक्रांत एका दमदार भूमिकेत दिसला आहे. विक्रांतशिवाय बॉबी देओल आणि सान्या मल्होत्रा यांच्याही मुख्य भूमिका लव्ह हॉस्टेलमध्ये आहेत.
'लव हॉस्टल'च्या ट्रेलरमध्ये अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. हा रोमॅंटिक सिनेमा असणार आहे. या सिनेमाचे निर्माते शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान आहे. तर रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि दृश्यम फिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
महत्वाच्या बातम्या
Chabuk : मिलिंद शिंदे आणि सुधीर गाडगीळ यांच्या अभिनयाचा 'चाबुक'
Love Hostel Trailer : शाहरुख खान निर्मित 'लव हॉस्टल' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, बॉबी देओल, सान्या मल्होत्रासह विक्रांत मेस्सी सारखी तगडी स्टारकास्ट
Amruta Fadnavis : 'व्हॅलेंटाईन डे'ला अमृता फडणवीसांचा नवा 'अवतार'; फोटो शेअर करत केली नव्या गाण्याची घोषणा
Kangana Ranaut Update: ‘अशा पालकांवर कारवाई करावी...’, ‘गंगूबाई काठियावाडी’चे डायलॉग बोलणाऱ्या चिमुकलीवर संतापली कंगना रनौत!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)