(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Binge Watch : उन्हाच्या तडाख्यामुळे बाहेर जाणं शक्य नाही? मग, घर बसल्या पाहा ‘हे’ चित्रपट आणि वेबसिरीज!
Binge Watch : तुमचा लॅपटॉप किंवा फोन उघडून तुम्ही या उत्तम चित्रपटांचा आनंद घेऊ शकता आणि तुमचा कंटाळा दूर करू शकता.
Binge Watch : आजकाल उन्हामुळे बाहेरील तापमान प्रचंड वाहले आहे, हे आपल्याला चांगलेच माहीत आहे. अशा परिस्थितीत फिरायला जाण्यासाठीच नव्हे तर, चित्रपट पाहण्यासाठी बाहेर जाण्याचा विचार करणं लोक टाळतात. मात्र, अशावेळी तुम्ही घरबसल्या देखील चित्रपट किंवा सिरीजचा आस्वाद घेत आपलं मनोरंजन करू शकता. नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट पाहून, तुम्ही घरी बसून मनोरंजनाचा डोस घेऊ शकता आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते पाहण्यासाठी तुम्हाला कडक उन्हात बाहेर जावे लागणार नाही. तुमचा लॅपटॉप किंवा फोन उघडून तुम्ही या उत्तम चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. आणि तुमचा कंटाळा दूर करू शकता.
सध्या सर्वत्र नव्या वेब सिरीज आणि चित्रपटांचा बोलबाला आहे. चला तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दमदार चित्रपट आणि सिरीजबद्दल जाणून घेऊया...
दसवी
अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत कौर यांचा ‘दसवी’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 7 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे आणि हा चित्रपट तुम्ही घरात बसून सहज पाहू शकता. जर, तुम्हाला अभिषेकची जाट स्टाईल बघायची असेल, तर हा चित्रपट आवर्जून पाहायलाच हवा. अभिषेक बच्चनचा हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
गुल्लक 3
‘गुल्लक’चे दोन्ही सीझन प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत आणि आता सोनी लिव्हच्या ‘गुल्लक’चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील छोटय़ा-छोटय़ा समस्यांचे निराकरण तुम्हाला ‘गुल्लक 3’मध्ये पाहायला मिळेल आणि याची कथाही तुम्हाला अगदी आपलीशी वाटेल.
अभय 3
कुणाल खेमूची ‘अभय’ ही खास वेब सिरीज झी 5वर प्रदर्शित झाली आहे. या सिरीजचे 2 सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. जर, तुम्हाला क्राईम थ्रिलरची आवड असेल, तर तुम्ही ही सिरीज आवर्जून पाहू शकता.
हेही वाचा :