Samrat Prithviraj : 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती; जाणून घ्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन
रमेश बाला यांनी ट्वीट शेअर करुन या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे.
Samrat Prithviraj box office collection day 1 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj ) हा चित्रपट काल (3 जून) रिलीज झाला. रिलीजपूर्वी या चित्रपटाला वादाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे निर्मात्यांना चित्रपटाचे नाव बदलावे लागले होते. यासोबतच अनेक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू शकेल का, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. रमेश बाला यांनी ट्वीट शेअर करुन या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे.
रमेश बाला यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे, 'भारतामध्ये सम्राट पृथ्वीराजनं 11 कोटींची कमाई केल्याची शक्यता आहे.' त्यामुळे रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 10 ते 11 कोटींची कमाई केली आहे, असा अंदाज लावला जाऊ शकतो.
#SamratPrithviraj All-India Nett Day 1 early estimates around 11 Crs..
— Ramesh Bala (@rameshlaus) June 4, 2022
कलाकारांचे मानधन
अभिनेता अक्षय कुमारनं पृथ्वीराज चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. रिपोर्टनुसार या चित्रपसाठी त्यानं 60 कोटींचे मानधन घेतलं आहे. पृथ्वीराज या चित्रपटामधून मानुषीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ती या चित्रपटामध्ये संयोगिता ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी मानुषीनं एक कोटी एवढे मानधन घेतलं आहे, अशी चर्चा आहे. केजीएफ चॅप्टर-2 या चित्रपटामुळे सध्या संजय दत्त चर्चेत आहे. आता त्या चित्रपटानंतर लवकरच पृथ्वीराज या चित्रपटामधून संजय प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रिपोर्टनुसार, पृथ्वीराज चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारण्यासाठी संजयनं पाच कोटी मानधन घेतलं आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा :
- Entertainment News Live Updates 4 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- S. P. Balasubrahmanyam Birth Anniversary : ‘दक्षिणेतील रफी’ अशी ओळख, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही कोरले नाव! वाचा एस. पी. बालासुब्रमण्यमबद्दल...