Entertainment News Live Updates 4 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
सिद्धू मुसेवाला यांच्या किडनी, यकृतासह 19 ठिकाणी गोळ्यांच्या जखमा, पोस्टमॉर्टम अहवालातून उघड
प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची रविवारी 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुसा गावामध्ये मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्यांच्या पोस्टमार्टम अहवालातून त्यांच्या मृत्यू संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. मुसेवाला यांच्या शरीरावर 19 गोळ्यांच्या जखमा असल्याचं समोर आलं आहे. तसेच जखमी झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाल्याचं अहवालात उघड झालं आहे.
पोस्टमार्टम अहवालातून समोर आलं आहे की, सिद्धू मुसेवाला यांच्या शरीरावर 23 जखमांच्या खुणा होत्या. किडनी, यकृत, पाठीचा कणा या ठिकाणी गेळी लागली होती. 14 ते 15 गोळ्या शरीराच्या पुढच्या भागावर लागल्या होत्या. तर तीन ते चार गोळ्या त्यांच्या उजव्या हाताच्या कोपरावर लागल्या होत्या. त्यांच्या शरीरावर तीन ते पाच सेंमीपर्यंतच्या जखमा आढळल्या आहेत.
मानसा जिल्ह्यात रविवारी शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.
कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) कोरोनाची लागण झाली आहे. कार्तिक हा सध्या त्याच्या भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Urmilla Kothare : 'कळकळीची विनंती करते...'; उर्मिला कोठारेनं शेअर केला व्हिडीओ
Urmilla Kothare : 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत मल्हारची बायको आणि स्वराच्या आईचे वैदेहीचे पात्र उर्मिला कोठारे (Urmilla Kothare) साकारत होती. आता मालिकेत स्वराच्या आईचे निधन होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकानुसार उर्मिला कोठारे मालिकेमधून एक्झिट घेणार आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता उर्मिलानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन या मालिकेबद्दल एक माहिती दिली आहे.
























